Lalbaugcha raja 2024 : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आपण पाहिली. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे असतात. अशावेळी ११ दिवस सुरू असलेली भाविकांची गर्दी अखेर बाप्पाला निरोप देण्याच्या काही तास अगोदर विसर्जनाच्या तयारीसाठी म्हणून दर्शनाच्या रांगा बंद करतात. चरण स्पर्श रांग सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता बंद झाली आणि मुख दर्शन रांग मध्यरात्री १२ वाजता बंद झाली. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत अचानक फोटो घेताना दिसले.
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
Viral video: लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावराणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत अचानक फोटो घेताना दिसले.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-09-2024 at 11:00 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai video of last man to take darshan of lalbaugcha raja goes viral netizens call him luckiest video goes viral srk