बदल हा जगाचा नियम आहे आणि हा नियम प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू होतो. म्हणूनच प्रत्येक पिढीनुसार किंवा कालांतराने, खाद्यसंस्कृत, राहणीमान, विचार आणि समाजामध्ये बदल होत असते. राहणीमान एकमेव गोष्ट आहे ज्यात वेगाने बदल होत आहे. कपड्यांपासून शजूपर्यंत रोज बाजारात नवीन फॅशन येत असतात जे लोकांना आवडतात. आजकाल फॅशनच्या नावाखाली काहीही प्रयोग केले जातात. काहींना ते आवडतात आणि काहींना ते आजिबात आवडत नाही. सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये विचित्र फॅशनचे शूज दिसत आहे जे पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो.

कधीही पाहिली नसेल अशी फॅशन!
सोशल मीडियावर एक शूजचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शूज इतका विचित्र आहे की, जो पाहून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसल आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक मुलगी तिच्या पायात शूज घालत आहे. पण हे शूज कमी आहे नाग असल्यासारखा जास्त वाटत आहे. होय! या तरुणीने जे शूज घातले आहे त्याच्या त्याला नागिन लूक देण्यात आला आहे. कोणी पहिल्यांदा हे शूज पाहिले तर नक्कीच त्याला हा नाग वाटेल.

हेही वाचा – VIDEO: इमारतीमध्ये आग लागल्याचे पाहून बोलावले अग्निशमन दल; पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच काहीतरी

व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @neelu_kaushik_4685 नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ शेअर काला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे. व्हिडीओ पाहून एकाने लिहिले की, “हे चूकीचे आहे, नाग देवतेचा अपमान आहे.”