Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. त्या व्हिडिओमध्ये एक महिला लखनऊच्या शहीद पथावर चालत्या गाडीतून बाहेर वाकून धक्कादायक कृत्य करताना दिसते. या प्रकारामुळे शहरातील इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर बेफिकीर वागणुकीबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हायरल व्हिडीओ (Naked Woman Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की काळ्या गाडीतून (उत्तर प्रदेश नंबर असलेली) एक महिला प्रवास करत आहे. ती नग्न अवस्थेत असल्याचंही सांगितलं जातंय. गाडी भरवेगात सुरू असताना ती आपले अर्धे शरीर खिडकीबाहेर काढून काही अयोग्य कृती करत असल्याचे दिसते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @upkabar या इंस्टाग्राम अकाऊंटनुसार, शेअर करण्यात आला असून “लखनऊमधील शहीद पथ येथून एक लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक तरुणी कारमध्ये नग्न अवस्थेत प्रवास करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तिने रस्त्यावर अश्लील कृत्ये केली, तिचे अर्धे शरीर चालत्या कारच्या खिडकीतून बाहेर पडले होते. रस्त्याने जाणाऱ्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पोलिस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.” व्हिडीओला अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
FPJच्या वृत्तानुसार रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, पोलिस विभागाकडून अधिकृत पुष्टी अजून आलेली नाही. या घटनेबाबत किंवा संबंधितांवर कोणती कारवाई होणार याबाबत अधिकार्यांनी अजून काहीही वक्तव्य केलेले नाही.
ही घटना एकटीच नाही. शहीद पथ हा रस्ता आता धोकादायक प्रकार करणाऱ्या लोकांसाठी त्रासदायक ठिकाण बनला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत या रस्त्यावर लोक बेफिकीरपणे वागत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशा प्रकारांमुळे ते स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण करत आहेत.
अशा घटना वारंवार घडत असल्याने उत्तर प्रदेशच्या राजधानीतील या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतूक नियम आणि लोकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “कदाचित गाडीत तिला गरम होत असेल म्हणून थंड हवा यावी यासाठी ती खिडकीत आली असेल” तर दुसऱ्याने “त्या कारमध्ये तिच्याबरोबर नेमकं काय घडलं असेल हे तिलाच माहित असावं” अशी कमेंट केली.
