Find Hidden Animals Image: इंटरनेटवर एक साधं; पण डोळ्यांनाच फसवणारं चित्र सध्या व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांचे अक्षरशः डोके गरगरत आहे. पहिल्या नजरेला हे चित्र एका सामान्य स्केचसारखं वाटतं; पण जर तुम्ही नीट पाहिलंत तर लक्षात येईल की, या एका चित्रात अनेक प्राणी लपलेले आहेत. एका साध्या वाटणाऱ्या चित्राने सध्या इंटरनेटवर खळबळ उडवली आहे. पाहणाऱ्याचं डोकं फिरवणारं हे ऑप्टिकल इल्युजन (दृश्यक भ्रम) सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. कारण- त्यामध्ये किती प्राणी लपलेले आहेत हे शोधताना अनेकांचा गोंधळ होत आहे. तुमची निरीक्षणशक्ती तीव्र आहे का? मग सांगा बरं चित्रात किती प्राणी लपले आहेत.

या चित्राकडे पहिल्यांदा पाहिल्यावर ते फक्त एक सामान्य रेखाचित्र वाटतं; पण जर तुम्ही डोळे नीट उघडे ठेवून, थोडं ‘ध्यान देऊन’ पाहिलं, तर अनेक प्राण्यांचे आकार, छटा, रेषा आणि एकंदरच पूर्ण छायाचित्र हळूहळू उलगडायला लागतं. इंटरनेट युजर्सनी हे चित्र पाहिल्यावर आपापले अनुभव शेअर केलेत, कुणाला ४ प्राणी दिसले, तर कुणी ७ म्हणाले. पण, सर्व प्राणी ओळखणं ही खरी कसोटी आहे.

या व्हायरल झालेल्या फोटोने लोकांची दृष्टी, निरीक्षणशक्ती आणि मेंदूची प्रक्रिया समजून घेण्याची क्षमता यांची परीक्षा घेतली आहे. हे चित्र एक्स (पूर्वीचं ट्विटर)वर शेअर करण्यात आलं असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. “माझा डोळ्यांवर विश्वास बसत नाही”, “हे एक मिनिटाचं काम नाही”, “माझं पूर्ण लक्ष लागलं तरी ५ प्राण्यांवरच थांबलो!” काही युजर्सनी या कोड्याला “दिमागी भूकंप” असंही नाव दिलंय. एका वापरकर्त्याने या चित्राला “क्लासिक दिमागी कोडे” म्हणत एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट केलं आणि विचारलं, “तुम्हाला किती प्राणी दिसले?”

प्रश्न एकच – तुम्हाला खरंच सगळे प्राणी दिसतात का?

जर अजूनही तुमचं उत्तर ५ किंवा ६ वर अडकलं असेल, तर अजिबात चिंता करू नका. हा दृश्यभ्रम सोडवण्यासाठी एक सोपी युक्ती आहे – चित्राला भागांमध्ये विभागा, प्रत्येक कोपरा वेगवेगळा स्कॅन करा आणि समांतर रेषांमधून लपलेले आकार शोधण्याचा प्रयत्न करा.

हे सगळे प्राणी चित्रातील रेषा, सावल्या व आकारांत इतक्या सफाईने लपवण्यात आले आहेत की, एका वेळी पाहून त्यांना ओळखणं जवळपास अशक्यप्राय वाटतं. हा अनुभव हेच सांगतो की, आपला मेंदू कधी कधी आपल्या डोळ्यांना फसवतो आणि त्यामुळे प्रत्यक्षात जे समोर आहे, ते ओळखणं अवघड होऊन बसतं.

येथे पाहा फोटो

तुमची निरीक्षणशक्ती किती तीव्र आहे? चित्र पाहताना तुम्ही मन किती एकाग्र करू शकता? हे पाहायचं असेल, तर एकदा तरी हे चित्र नक्की पाहाच. आणि हो जर तुम्हाला सगळे नऊ प्राणी सापडले, तर समजा तुम्ही खरेखुरे ‘ब्रेन जीनियस’ लेव्हलचे आहात, यात शंका नाही.

आणि आता, तुमच्या प्रतीक्षेचा शेवट!
या चित्रामध्ये लपलेले आहेत हे ९ प्राणी

अस्वल, गाय, लांडगा, कावळा, मांजर, ससा, फुलपाखरू, चिमणी, गोगलगाय…