Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात.काही ऑप्टिकल इल्यूजन खूप क्रिएटिव्ह असतात. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही क्षणभरासाठी थक्क व्हाल.निर्सगाची किमया या व्हिडीओमध्ये टिपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन

या ऑप्टिकल इल्यूजनच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हिरवीगार झाडी दिसत आहे. झाडांच्या मागे लाल केशरी रंगाने भरलेलं सुंदर आकाश दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अर्धे डोळे बंद करा आणि काय दिसते ते कमेंटमध्ये लिहा” खरंच या व्हिडीओमध्ये झाडांशिवाय दुसरे काही दिसत आहे का?

हेही वाचा : Saree Hacks : रबर बँडच्या मदतीने करा परफेरक्ट साडीच्या निऱ्या; अनोखा जुगाड, पाहा VIDEO

राधा कृष्ण दिसताहेत का?

या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ तुम्ही नीट पाहला तर तुम्हाला फक्त हिरवी झाडे दिसणार नाही तर या शिवाय तुम्हाला दोन कलाकृती दिसेल. तुम्ही आणखी नीट पाहाल तर तुम्हाला झाडाच्या फाद्यांपासून बनलेली राधा कृष्णाची प्रतिमा दिसेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी “राधा कृष्ण” दिसत असल्याचे व्हिडीओत सांगितले आहे तर काही युजर्सनी व्हिडिओ पाहून कमेंट्समध्ये “जय श्री कृष्णा” लिहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion do you see radha krishna in video hide within branches of trees video goes viral puzzle news ndj