Optical Illusion: There's a snake hiding in 'this' picture, find it quickly, you only have 11 seconds! | Loksatta

Optical Illusion: ‘या’ चित्रात लपलाय एक साप, लवकर शोधून काढा, तुमच्याकडे आहे फक्त ११ सेकंदाचा वेळ!

तुम्हाला या चित्रात लपलेला साप शोधून काढायचा आहे. मग लागा लगेच कामाला.

Optical Illusion: ‘या’ चित्रात लपलाय एक साप, लवकर शोधून काढा, तुमच्याकडे आहे फक्त ११ सेकंदाचा वेळ!
(Photo-Social media)

Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप आवडतात. कारण ते लोकांना कन्फ्यूज करतात. लोकांना त्यातील रहस्य उलगडण्यात चांगलीच मजा येते. ऑप्टिकल इल्युजन हे असे चित्र असते जे केवळ डोळ्यांनाच नाही तर मनालाही फसवणारे असते.

असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या फोटोत आजुबाजूला झाडे असलेले एक जुने घर दिसत आहे. आजुबाजुचे परिसर यात खूप सुंदर दिसत आहे. परंतु या परिसरातच कुठेतरी एक विषारी साप लपलेला आहे. तुमच्याकडे ११ सेकंदाचा वेळ आहे. तुम्हाला या चित्रात लपलेला साप शोधून काढायचा आहे. मग लागा लगेच कामाला.

तुम्ही साप पाहिला का?

चित्रात कुठेतरी लपलेला साप शोधणे हे तुमच्यासाठी आव्हान आहे. साप शोधण्यासाठी तुमच्याकडे ११ सेकंद आहेत. फोटोत साप लपून बसला आहे. ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियात सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे. हा फोटो मनाला आणि डोळ्यांना फसवणारा असा आहे. अनेकांनी सातत्याने या फोटोकडे पाहून त्यात लपलेला साप शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. तुम्हाला ११ सेकंदात लपलेला साप तुम्हाला शोधायचा आहे. पाहा तुम्हाला दिसतेय का?

(आणखी वाचा : Optical Illusion: ‘या’ फोटोत किती प्राणी लपले आहेत? ५ की ३? अचूक उत्तर देणारा ठरेल जिनियस )

अद्यापही तुम्हाला दिसला नाही का साप?

लवकर कर; वेळ संपत आहे. लगेच शोधून दाखवा. हा साप या चित्रातील गवतामध्ये लपला आहे. जर तुम्ही ११ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत साप शोधू शकत असाल तर तुम्हाला गरुडाचे डोळे आहेत.

साप कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे का?

फोटोच्या तळाशी मध्यभागी साप दिसू शकतो, सुरुवातीला तो काठीसारखा दिसतो, पण जवळून पाहिल्यावर तो साप असल्याचे समोर आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:13 IST
Next Story
Video: माझा नवरा मला… घरगुती कार्यक्रमात बेभान झाली सुनबाई; असं काही केलं की नवऱ्याने तोंडच लपवलं