Viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर साप, नाग किंवा अजगर पकडण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण,अशा प्रकारचे प्राणी पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षण गरजेचं असतं; अन्यथा हे धाडस जीवावर बेतू शकतं. हे माहीत असूनही काही जण या बाबतीत दुर्लक्ष करून साप, नाग, किंग कोब्रा, अजगर पकडण्याचं धाडस करतात. दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क अजगराला किस करत आहे. व्हिडीओ बघून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पाण्यातून महाकाय अजगराला ताकद लावून बाहेर काढत आहे. यावेळी सुरुवातीला अजगर चिखलात असल्यामुळे तो इतका महाकाय आहे याचा अंदाज येत नाही. मात्र जसा तो बाहेर येतो तसा तो व्यक्तीला गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र हा तरुण संपूर्ण ताकद लावून त्याचं तोंड धरतो. फक्त तोंडच धरत नाही तर त्याला किसही करतो. हे दृश्य पाहूनच अंगावर काटा येतो मात्र हा तरुण बिनधास्त हे कृत्य करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लग्नाचा मांडव बनला आखाडा; भर मंडपातच तुंबळ हाणामारी अन् पुढे…चक्रावून टाकणारा Video Viral

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @therealtarzann या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person dragged giant python out of water mouth pressed and kissed and shocking video srk