Pune dagdusheth ganapati chori video: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात रोज भाविकांची मोठी गर्दी असते. तासंतास रांगेत उभे राहून भाविक बाप्पाचं दर्शन घेत असतात. अशातच पु्ण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर एक धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. देवाच्या दारातच सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात हा प्रकार सुरु होता. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुण्यातल्या दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भर दिवसा अशी चोरी केलीय की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अवघ्या २ सेकंदात या बायकांनी अशी चोरी केली पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मंदिराबाहेर भाविक रांगेतून एक एक करत आतमध्ये जात आहेत. अशातच दोन बायका या रांगेतून मध्येच घुसण्याचा प्रयत्न करतात आणि एका महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोनसाखळीवर हात मारतात. सराईतपणे कुणालाही कळायच्या आत ही महिला चोरी करताना दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला इंदापूर तालुक्तातील विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. रविवारी (४ एप्रिल) दुपारी तीनच्या सुमारास त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. त्या लहान मुलीला घेऊन दर्शन रांगेत थांबल्या होत्या. त्या वेळी आरोपी माधुरी आणि काव्या हिने तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांचे सोनसाखळी चोरुन नेली. महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. दर्शनरांगेतील भाविकांनी माधुरी आणि काव्या यांना पकडले. पकडून सुरक्षारकांच्या ताब्यात दिले. पोलीस कर्मचारी काटे तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरातील दर्शन रांगेत महिला भाविकांकडील दागिने चोरणाऱ्या दोघींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. माधुरी संतोष डुकरे-घाडगे (वय ३०), काव्या तनवीर जाधव (वय २१, दोघी रा. यवत रेल्वे फाटकाजवळ, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.