Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असं शहर आहे. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, भाषा, शिक्षण या शहराची ओळख आहे. पुणेरी पाट्यांपासून पुणेरी टोमणे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
पुणे शहराचा इतिहास खूप मोठा आहे. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहे जी या शहराच्या सुंदरतेत आणखी भर टाकतात. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात. अनेक ठिकाणांना भेट देतात पण काही ठिकाणे असे असतात की ज्याविषयी अनेकांना माहिती नसते.

सध्या एक असाच एक पुण्यातील सुंदर ठिकाणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एक सुंदर गार्डन दाखवले आहे. हे गार्डन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील सुंदर गार्डन

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर गार्डन दिसेल. या गार्डनमध्ये हिरवी झाडी, रोपटे, हिरवे गवत, तलाव, नदी आणि सुंदर कारंजे दिसत आहे. छोटे मोठे धबधबे दिसत आहे. हे हिरव्या झाडांनी आणि रंगबेरंगी फुलांनी सजलेले गार्डन अतिशय आकर्षक दिसत आहे. या व्हिडीओत तुम्हाला सूर्यास्त होताना दिसेल. हे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. या गार्डनचा हा सुंदर नजारा पाहून तुम्हाला एकदा तरी येथे भेट द्यावीशी वाटेल.

हेही वाचा : “लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video

पुण्यात हे गार्डन नेमकं कुठे आहे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे गार्डन नेमकं आहे तरी कुठे? तर हे पुण्यातील प्रसिद्ध असे पु. ल. देशपांडे गार्डन आहे. हे गार्डन सिंहगड रोडवर स्थित आहे. हे गार्डन ‘पुणे ओकायामा मैत्री गार्डन’ या नावाने सुद्धा ओळखले जाते. पुणे आणि ओकायामा (जपान देशातील शहर) शहरांमधील मैत्रीचे प्रतीक आहे. हे गार्डन जपानी पद्धतीने तयार केलेले आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : कोल्हापूरात टॅलेंटची कमी नाही! शालेय विद्यार्थ्याने केली एसटी महामंडळाची अनाउन्समेंट; आवाज ऐकून बस डेपोमध्ये आल्यासारखं वाटेल, पाहा VIDEO

pune_trending_’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील हे गार्डन तुम्ही पाहिलं का?” या व्हिडीओवर अनेक युजर्नसी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पु. ल. देशपांडे गार्डन” तर एका युजरने लिहिलेय, “पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन, दत्तवाडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी आवडती जागा”