पुणेकर कधी काय करतील हे सांगता येत नाही हे सिद्ध करणारे कित्येक किस्से आणि घटना रोज समोर येत असतात. पुण्यातील रिक्षाचालकांपासून पुणेरी पाट्यांपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रेनकोट घरी विसरल्यानंतर चक्क कारचे कव्हर डोक्यावर धरून तीन तरुण दुचाकीवरून प्रवास करत होते. आता पुन्हा एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे पुण्यातील एका महिलेने मिटिंगमध्ये तिच्या मॅनेजरने तिला लिहिलेल्या मेसेजचा खुलासा केल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य झाले. या पोस्टवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल पोस्टनुसार ही तरुणी ऑफिस मिटिंग सुरू असताना बिस्किट खात होती, त्यावर तिच्या मॅनजरने जे उत्तर दिले…त्याचा स्क्रिनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. धीमाही जैन नाव असलेल्या या तरुणीने मिटिंग चालू असताना आवडते बिस्कीट खाण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. पण ती बिस्कीट खात आहे तिच्या मॅनजरला कळाले कारण तिने तिचा माईक म्युट केला आहे आणि मॅनेजरला काही समजणार नाही. पण झाले उलटेच.
X वरील आता व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तिने मॅनेजरच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि काय घडले ते स्पष्ट केले. मॅनजेरला ती बिस्किट खात आहे कसे कळाले याचाही खुलासा केला आहे. “आज, मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि कामाच्या कॉल दरम्यान माझ्या आवडत्या कुकीज (बिस्कीट ) खाण्यास सुरुवात केली, असा विचार करून की तिने माईकमधू काय आवाज जाणार नाही.” तिने लिहिले.
स्क्रीनशॉटमध्ये तिच्या मॅनेजरचा एक मजेशीर मेसेज दाखवण्यात आला ज्यामध्ये त्याने लिहिले होते: “धीमाही,तुमच्या कुकीजचा आवाज आम्हाला ऐकू येतोय, कृपया स्वतःचा माईक म्यूट करा.”
येथे पाहा पोस्ट
तिची मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांना मॅनजेरचा मेसेज वाचून हसू येत आहे. अनेकांनी मजेशीर कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक वापरकर्त्यांनी घरून काम करताना अशाच परिस्थितींचा सामना केल्याचे कबूल केले.
“जेव्हा बिस्किट तुमच्यापेक्षा मीटिंगमध्ये जास्त आवाज करते,” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्याने म्हटले, “जर बिस्किट बरोबर चहा असता तर आम्हालाही तोच आवाज ऐकायला मिळाला असता.”
“त्यांनाही(मॅनेजरला) भूक लागली आहे असे दिसते,” एका वापरकर्त्याने म्हटले.
इंटरनेटवरील काही लोकांना ही पोस्ट खूपच मजेशीर वाटली. “जेव्हा तुमचा नाश्ता तुमच्यापेक्षा जास्त बोलतो,” असे एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “बिस्किटची ताकद कधीही कमी लेखू नका.”