पावसाळ्यात सर्वत्र साप आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांची दहशत दिसू येते. या ऋतूत अनेक ठिकाणी साप बाहेर येत असल्याचे सर्रास पाहायला मिळते, म्हणून पावसाळ्यात नेहमी सतर्क राहण्याची गरज असते. अशाच एका घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की, पावसाळ्यात बाहेर ठेवलेली कोणतीही वस्तू उचलण्याआधी किंवा चप्पल घालण्याआधी ती नीट तपासून घेतली पाहिजे, नाहीतर कोणतीही अप्रिय घटना घडू शकते, आणि अशाच घटनेचा प्रत्यय या व्हिडीओमध्ये आला आहे.
चप्पलखालून बाहेर आला साप
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दाराबाहेर काढलेली चप्पल उचलताना दिसत आहे. त्या चप्पल खाली सापाचं पिल्लू बसलेले दिसते. तरुण चप्पल उचलतो तेव्हा एक छोटा साप फणा पसरवून उभा राहताना दिसतोय. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, साप खूप संतापलेल्या स्थितीत दिसत आहे. यामुळे तुम्ही पावसाळ्यात पायात चप्पल घालण्याआधी ती नीट डोळे उघडे ठेवून आधी तपासली पाहिजे. नाहीतर साप किंवा ज्यात लपून बसलेले इतर प्राणी कधी तुमच्यावर हल्ला करतील सांगता येत नाही.
हा व्हिडीओ animal_lover_wagad नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, यार, मी न पाहता चप्पल घालतो. भविष्यात काळजी घ्यावी लागेल. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही लोकांना जागरूक केले आहे. तिसऱ्या एका यूजरने लिहिले की, सापाला मारू नका भाऊ, आता सावन सुरू आहे. तर आणखी एका युजरने, हे सापाचे पिल्लू आहे, त्याला जंगलात सोडले पाहिजे असे म्हटले आहे.
