Viral video: सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तुम्हाला चांगले आणि वाईट, असे दोन्ही प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे लोक प्रेक्षणीय स्थळी आणि डोंगरावर जातात. आता जेव्हा अनेक लोक सहलीला जातात तेव्हा त्यांच्यासोबत विविध प्रकारच्या घटना व दुर्घटनाही घडतात; ज्याचे व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महिला एका मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. मात्र, यामागचं कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक महिला एका पुरुषाला कशी मारहाण करताना दिसत आहे. महिला आपल्या पतीसोबत हृषिकेशला फिरायला आली होती. यादरम्यान हृषिकेशमधील राम झुलावर या व्यक्तीनं महिलेच्या पतीसोबत गैरवर्तन केलं. त्यानं पतीशी गैरवर्तन केल्यामुळे ती महिला इतकी चिडली की, तिनं त्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिलेनं एका पुरुषाच्या कॉलरला कसं पकडून ठेवलं आहे आणि ती त्या पुरुषाला सोडण्यास तयार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत महिलेची पुरुषासोबत बाचाबाची झाली. लोक महिलेला त्या पुरुषाला माफ करण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर ती महिला चिडते आणि त्या पुरुषाच्या कानशिलात लगावते. भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यावर युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन; पहाटे ५ वाजता समोरचं दृश्य पाहून सर्वांचाच थरकाप उडाला
@gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे; तर हजारो लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे. अशा परिस्थितीत युजर्स व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका युजरने लिहिले… कोणत्याही कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी वाद निर्माण करणाऱ्या महिलेला शिक्षा झाली पाहिजे. आणखी एका युजरने लिहिले… बिचारे पोलिसही शांतपणे हा शो पाहत आहेत. तर दुसऱ्या युजरने लिहिले… व्हिडिओमध्ये “कोणाची चूक आहे हे शोधणे कठीण आहे, पण नवऱ्याच्या बाजूने लढणारी बायको प्रत्येकाला मिळो”
© IE Online Media Services (P) Ltd