एका वडील आणि मुलीचं नातं किती घट्ट असतं हे सर्वांना माहीत आहे. सध्या असाच एक बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्याला सोशल मिडीयावर खूप प्रेम मिळत आहे. जेव्हा पदवीदान समारंभात वडील स्टेजवर जातात, तेव्हा मुलगी अशी काही प्रतिक्रिया देते की, तिथे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटते. वडीलही हसायला लागतात. प्रेक्षकांमध्ये बसलेली मुलगी जोरात ओरडते- आय लव्ह यू डॅडी. त्यानंतर काय झाले यासाठी हा व्हायरल व्हिडीओ पहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेला व्हिडिओ स्कॉटलंडचा आहे, ज्यामध्ये पदवीदान समारंभात एक व्यक्ती स्टेजवर उभा असल्याचे दिसत आहे. तो प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे जात असताना, प्रेक्षकात बसलेली त्याची मुलगी जोरात ओरडते आणि म्हणते, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे बाबा. अभिनंदन.’ ती ही ओळ अनेक वेळा बोलते. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले हसू लागतात. आपल्या मुलीचा आनंद पाहून तो माणूसही हसतो आणि आपल्या हातांनी आपल्या मुलीकडे आपले हृदय करून तो आपले प्रेम व्यक्त करतो.

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : वैमानिक मुलानं पालकांना दिलं भन्नाट सप्राईज; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल त्याचं कौतुक)

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ‘माझ्या संपूर्ण पदवीदान समारंभातील हा सर्वात गोड क्षण होता जो माझ्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तसंच पुढे लिहिलंय, माझ्या छोट्या राजकुमारीशिवाय माझा पदवीदान समारंभ चांगला झाला नसता. जेव्हा तिचे शब्द शांत समारंभाच्या सभागृहात प्रतिध्वनीत झाले, अभिनंदन बाबा, आय लव्ह यू. उपस्थित सर्वांसोबत माझेही हृदय भावूक झाले. पदवी पुरस्काराऐवजी, मला वाटले की माझ्या मुलीचे वडील होणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी आहे. ती जगातील सर्वोत्तम मुलगी आहे. लोक म्हणतात ‘जशी मुलगी तशी बाप.’

( हे ही वाचा: ‘मी पेन्सिल मागितली तर आई मला मारते’: लहान मुलीची पीएम मोदींकडे महागड्या पेन्सिल, मॅगीबाबत तक्रार)

हा व्हायरल व्हिडीओ shivaeenalawade_ नावाच्या युजरने हा पोस्ट केला असून ह्या व्हिडीओला आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. कुणी म्हटलंय की बाप-मुलीचे नातं सगळ्यात गोड असतं, तर कुणी म्हटलंय किती सुंदर दृश्य आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी व्हिडिओला गोंडस आणि हृदयस्पर्शी असे वर्णन केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seeing her father on the stage the girl screamed and said love you daddy you will also be emotional after watching this video gps