Shahrukh Khan Duplicate Viral Video : बॉलीवूड किंग शाहरुख खानने वयाची साठी गाठल्यानंतरही त्याची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. किंग खानने अनेक दशकांच्या मेहनतीने बॉलीवूड इंडस्ट्रीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. सामान्य घरातून आलेल्या या अभिनेत्याने आज फक्त हिंदीच नाही तर हॉलीवूड चित्रपटसृष्टीतही एक वेगळी मजल गाठली आहे, यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास त्याच्या बंगल्याबाहेर उभे असतात. यावरून आजही त्याची किती क्रेझ आहे तुम्हाला समजलं असेल. पण, शाहरुखच्या स्टारडममुळे त्याच्यासारख्या दिसणाऱ्यांचे आयुष्यही आता रुळावर येत आहे. अलीकडेच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात नकली शाहरुख खानला पाहण्यासाठी चक्क सारं गाव जमलं होतं.
व्हिडीओत पाहू शकता, सेम शाहरुख खानसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहण्यासाठी एका गावात हजारो लोक जमले आहेत. लोक त्याच्याशी हात मिळवण्यासाठी आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यास उत्सुक दिसत आहेत. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की, जणू ते खऱ्या शाहरुख खानला भेटायला आले आहेत.
नकली शाहरुख खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केला आहे, ज्यात लोक सांगताना दिसतायत की, सेम शाहरुख खानसारखी दिसणारी एक व्यक्ती एका कार्यक्रमासाठी आली होती, ज्याला पाहण्यासाठी सारं गावं जमलं होतं. लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती की, कुठे पाय ठेवण्यासाठीही जागा नव्हती. लोक घराच्या छतावर तर कुठे घरच्या पत्र्यावर उभे राहून नकली शाहरुख खानला पाहत होते. दूरवर नजर जाईल तिथे फक्त लोकांची गर्दीच गर्दी होती. त्यांचा उत्साह इतका होता की जणू काही खऱ्या शाहरुख खानला पाहत आहेत.
व्हिडीओमध्ये लोक नकली शाहरूखला पाहून जोरजोरात ओरडत आहेत, हसत आहेत आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी धडपड करत आहेत.
नकली शाहरूख खानचा हा व्हिडीओ @rose_k01 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स विविध कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “असे दिसतेय की शाहरुख खानचा जुळा भाऊ मेळ्यात हरवला होता, आता तो सापडला आहे.” दुसऱ्या युजरने व्यंगात्मकपणे लिहिले की, “येथे लोक पाच किलो रेशनसाठी रांगेत उभे आहेत आणि लाखो लोक नकली शाहरुखला पाहण्यासाठी जमले आहेत, हा खरा भारत आहे.” काहींनी याला बेरोजगारीचे परिणाम म्हटले, तर काहींनी याला शाहरुख खानच्या लोकप्रियतेचा पुरावा मानले. शेवटी एकाने लिहिले की, “एखाद्या व्यक्तीला मूर्ख बनवणे किती सोपे आहे हे यावरून दिसून येते.”