Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. विचार करा तु्म्ही एखाद्या नदीत किंवा तळ्यात अंघोळ करताना, डुबकी मारताना अचानक तुमच्या पायाखाली मगर आली तर? विचार करुनच अंगावर काटा आला ना..अशीच घटना एका व्यक्तीसोबत घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पाण्यामध्ये मजा करताना दिसत आहे. अचानक त्याला पाण्यात काहीतरी जाणवतं. तो आपले हात खाली घालतो, मग हात वर करताच हातात येते मगर…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. हा व्यक्ती मस्तपैकी पाण्यात पोहोत आहे. पण या नदीमध्ये एक मगर आहे. अन् ती शिकार करण्याच्या उद्देशानं या तरुणाभोवतील फिरतेय. दरम्यान या तरुणाला सुद्धा मगरीचा भास झाला. ही मगर त्याच्या पायावर हल्ला करण्याची तयारी करत होती. पण तेवढ्यात तरुणानं धाडस दाखवत या मगरीला पाण्यातून बाहेर काढलं. तिचा जबडा पकडून तिला दूर फेकून दिलं. अन् मग भीतीने तो ओरडत बोटीकडे धावला आणि कसाबसा आपला जीव वाचवला.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ bajoellente11 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आल आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज गेले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलं, देवाचे आभार की तो लहान होता, नाहीतर गोष्ट वेगळी असती. दुसऱ्याने कमेंट केली – अभिनंदन! तुम्हाला जीवन जगण्याची आणखी एक संधी मिळाली. तर आणखी एकानं, खूप नशीबवान आहे थोडक्यात मृत्यूला चकवा दिला अशी प्रतिक्रिया दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video a crocodile attacked a man while he was swimming in the river video viral srk