Shocking video: सासू-सुनेचं नातं हे जरा आंबट-गोडचं असतं. यात कधी वाद, तंटे, रुसवे-फुगवे आणि प्रेम, काळजी अशा सर्वच गोष्टी घडून येत असतात. सासू सुनेच्या नात्यावर आजवर अनेक मालिका आणि चित्रपट बनले आहेत. यात बऱ्याच एक क्रूर सासू आणि सासूचा जाच निमुटपणे सहन करणारी सून दाखवली जाते पण खऱ्या आयुष्यात मात्र सासू-सुनेचं हे चित्र बरंच बदलून आल्याचं आजकाल दिसून येत आहे. आता सासू सुनेवर नाही तर घरातील सुनाच सासवांवर दमदाटी करू लागल्या आहेत आणि अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका सुनेने आपल्या सासूला बेदम मारहाण केल्याचे दिसून आले आहे. यावेळी सासूची अवस्था पाहून तुम्हालाही दया येईल..

घरगुती भांडणातून वादावादीच्या घटना घडणं हे सामान्य आहे. पण हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले तर तो चिंतेंचा विषय बनतो. सासू सूनेचं भांडण याला अपवाद नाही. सासू-सुनेचे वाद नेमक्या कोणत्या घरात नसतात? घर म्हटल्यावर माणसं आणि वाद हे आलेच. पण त्यातून आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या व्यक्तीच्या कानशिलात लगावणे हा कुठला न्याय?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासू एका बाजूला बसली आहे आणि सून जमीनीवर झोपली आहे. यावेळी सून सासूला वारंवार मारहाण करताना शिवीगाळ करत आहे. सासूची साडी खेचून सून मारहाण करत आहे. सासू स्वत:चा बचाव करण्यासाठी मागे मागे सरकताना दिसत आहे मात्र सुनेची मारहाण काही थांबत नाही. वृद्ध सासूला प्रतिक्रार करता येईल अशीही परिस्थिती दिसत नाही त्यामुळे हतबल झालेल्या सासूला अशाप्रकारे मारहाण करणं कितपत योग्य असा सवाल आता नेटकरी करत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ nagarcity24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर टीका करत आहेत. दरम्यान, दोघी महिला आहेत. सून विसरते की एक दिवस ती देखील सासू होणार आहे. सुनेच्या आधी त्या घरात सासू येते. थोडा आदर आणि आश्रयाच्या बदल्यात तिला काय हवे आहे? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. तसेच “कर्म फिरून येणार” अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.