Viral Video: सोशल मीडियावर दररोज निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेशीर, भावनिक, आश्चर्यकारक, धक्कादायक असतात. यापैकी कधी कोणता फोटो किंवा व्हिडीओ चर्चेत येईल सांगता येत नाही. तर असाच एक धक्कादायक व्हिडीओ आज व्हायरल होत आहे. यामध्ये एका रिक्षा चालकास चोर म्हंटल्याने त्याने एका अज्ञात व्यक्तीस स्वतःच्या ई-रिक्षासह फरफटत घेऊन निघाला आहे.

ई-रिक्षा चालक एका अज्ञात व्यक्तीला त्याच्या ई-रिक्षासह रस्त्याच्या मधोमध फरफटत घेऊन जाताना दिसत आहे. प्रकरण असे आहे की, अज्ञात व्यक्तीने ई-रिक्षा चालकावर गॅस सिलेंडर चोरण्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ई-रिक्षा चालकाने रस्त्याच्या मधोमध या अज्ञात व्यक्तीस आपल्या रिक्षासह ओढण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यावरून चालणारे नागरिक चालकास रिक्षा थांबवण्याचा आग्रह करताना दिसले. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…डॉली चहाविक्रेत्याची दुबई सफर; एक कप कॉफी अन् बुर्ज खलिफाची झलक, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं आहे की, ई-रिक्षासह चालक एका अज्ञात व्यक्तीला फरफटत घेऊन जातो आहे. स्त्यावर डोकं आपटू नये म्हणून तो अज्ञात व्यक्ती रिक्षाच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून, नंतर जवळच्या लोकांकडे मदत मागताना दिसतो. पण, व्हिडीओ जसा पुढे जातो तसं काही वेळाने हा माणूस रस्त्यावर पडतो.

ई-रिक्षाच्या मागे असणाऱ्या एका दुचाकी चालकाने ही घटना स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतली आहे. तसेच सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ Reddit ॲपवरून @WesternLengthiness93 या युजरने शेअर केला आहे. ही क्रूर घटना कुठे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, व्हिडीओ पाहून नेटकरी ई-रिक्षा चालकावर संताप व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.