Shocking video: अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की प्राणी हेच माणसांचे सर्वात जवळचा मित्र असतो. त्यांच्या इतकं ईमानदार कोणीच असू शकत नाही. मात्र, अनेक लोक असे असतात ज्यांना प्राण्यांबद्दल अजिबातही प्रेम वाटत नाही. प्राण्यांना त्रास देण्यात त्यांना मजा येते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाचे जग मजेदार फोटो आणि प्राण्यांच्या व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्या लोकांना प्राण्यांची खूप आवड आहे, ते अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर बघण्यात घालवतात. असे लोक पाळीव प्राण्यांना घरातील सदस्य मानतात आणि त्यांना सांभाळतात. तर असेही काही लोक आहेत जे या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याचा आनंद घेतात. अशाच एका ठिकाणी चक्क बैलाला चिरडून मारण्यात आलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू सगळेच संतापले आहेत.

शेतकऱ्याचा सखा म्हणजे बैल. पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतो. शेतकरी आणि बैल यांचे नाते भारतीय संस्कृतीत अत्यंत जिव्हाळ्याचे, अतूट आणि पारंपरिक आहे, जिथे बैल केवळ एक जनावर नसून शेतकऱ्याचा सोबती, साथीदार आणि कुटुंबाचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र अशाप्रकारे एका बैलाला जाणूनबुजून कारखाली चिरडून मारल्याचे दिसते.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, रस्त्यावर एक बैल हळूहळू चालत आहे. काही वेळानंतर त्याच्या मागेून येणाऱ्या गाडीने आधी बैलाला ठरक्र मारली, ज्यामुळे बैल खाली पडतो. त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर परत येऊन रस्त्यावर पडलेल्या बैलाच्या अंगावरुन कार चढवतो. ही थरकाप उडवणारी घटना राजस्थानच्या सिका (सीकर) जिल्ह्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी बैल आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यातून त्याला बाहेर पडता येत नाहीये. अतिशय क्रूरपणे हा प्रकार करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thetrendingeyes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय, “घाबरु नको शेवटी इथेच फेडायच ए तुला, देवापेक्षा कर्म मोठे आहेत भाऊ हिशोब होणार” तर आणखी एक म्हणतो, “एक वेळ देव माफ करेल पण कर्म प्रत्येक पापाचं हिशोब ठेवतो”