Shocking video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. यावेळी काही लोकांनी या अजगराला अक्षरश: दगडानं ठेचण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

साप म्हणताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि त्यात जर का अजगर साप असेल, तर मग काय विचारायलाच नको. कारण अजगर ही सापांची सर्वात मोठी प्रजाती आहे. एका फटक्यात तो मगरीची सुद्धा शिकार करू शकतो.वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी ते शिकारीचे असतात तर कधी एखाद्या गमतीदार प्रसंगाचे. पण, काही वेळा प्राण्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून खूप भीती वाटते. सध्या दादारमधला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जिथे एक भलामोठा अजगर एका कारमध्ये अडकला होता.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दादरमधील खेडगल्लीत कारमध्ये एक भलामोठा अजगर अडकलेला दिसत आहे. यावेळी एक तरुण कारमधून बाहेर खेचत आहे. त्यानंतर हा अजगर कारच्या बोनेटमध्ये लपून बसतो. यावर दोन तरुण त्याला संपूर्ण ताकद लावून अजगराला बाहेर काढतात आणि बाजुला असलेल्या पाण्यानं भरलेल्या बादलीमध्ये टाकतात. धक्कादायक म्हणजे, यावेळी त्यातला एका तरुणाच्या हाताला कदाचीत अजगरानं हल्ला केला कारण तो सतत हात झटकताना दिसत आहे. अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालणं जीवावर बेतू शकतं. मुंबईत भर दिवसा भलामोठा अजगर पाहून सर्वच थक्क झाले आहेत. हा अजगर आलाच कसा असा प्रश्न सर्वजन विचारत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.