Huge snake enters mumbra railway station: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क मुब्रा रेल्वे स्टेशनवर एका विषारी साप आलाय.

यावेळी हा साप चक्क रेल्वेस्थानकावर आलाय. रेल्वेगाडीची प्रतीक्षा करत फलाटावर बसलेल्या प्रवाशांना तेथे अचानक साप दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भीतीपोटी त्यांची पळापळ सुरू झाली मात्र एक तरुणी अजिबात घाबरली नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे सापाचं पिल्लू असल्याचं ती व्हिडीओमध्ये म्हणत आहे पण तो लहान दिसणारा साप प्रचंड विषारी आहे. नशीब ही तरुणी त्याच्या आणखी जवळ गेली नाही, मात्र अशाप्रकारे सापाच्या जवळ जाणे किंवा सापाला हात लावणे जीवावर बेतू शकते. कोणता साप किती विषारी असू शकतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळे अशावेळी कोणतीही रिस्क घेऊ नये.

हा साप छोटाच असूून तो मोठ्या वेगात दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसून येतोय. व्हिडीओमध्ये दिसणारं हे पिल्लू अजगराचं असावं, अशी शक्यता आहे. मात्र काही लोकांच्या मते तो धामण प्रजातीचा साप असावा, कारण त्याच्या शरीरावर लांबट आणि गडद पट्टे दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DLo0jfsoK0A/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडीओ @asma__2504 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे भयानक आहे, कधीच कोणत्या सापाला हात लावायचा नाही”, तर आणखी एकानं, सर्प मित्राला बोलवलं की नाही असा सवाल केलाय. अशाप्रकारे सापाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.