सध्या जगभरातच चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर लोकांच्या घरात घुसून चोरी करत आहेत; तर कधी रेल्वेमध्ये पाकीटमार, फोन चोरण्याच्या चोरांची दहशत वाढू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोन चोरीच्या घटनांशी संबंधित असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या अशीच एक घटना लुधियानाध्ये घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

चोरीची धक्कादायक घटना

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये २६ जानेवारी रोजी लुधियानातील रोझ गार्डन जवळून एक तरुणी चालत असताना दुचाकीचालक तिचा फोन अचानकपणे हिसकावून घेत असल्याचे दिसतेय. फोन चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी ती तरुणी तिचा फोन धरून ठेवण्याचा जिवापाड प्रयत्न करत असताना दिसतेय. पण, चोर वेगात दुचाकी चालवत असतो आणि तिला कित्येक मीटरपर्यंत तसाच ओढून घेऊन जातो.

तिचा जीव धोक्यात असल्याचं कळताच तिथे असलेले काहीजण महिलेची मदत करण्यासाठी धावल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. तसंच त्यांनी चोराला पकडण्याचादेखील प्रयत्न केला. परंतु, त्या चोराला पकडण्यात त्यांंना अपयश आलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “लुधियाना येथील एक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लुधियानाच्या रोझ गार्डनजवळ एक पुरुष पायी जात असलेल्या महिलेकडून फोन हिसकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

तसंच “चोराने पळून जाण्याआधीच मुलीला काही अंतरापर्यंत खेचले जात असल्याचे यात दिसते. ही संपूर्ण घटना २६-०१-२०२५ रोजी प्रजासत्ताकदिनी सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती,” असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

२७ जानेवारी रोजी शेअर केलेल्या व्हिडीओला ५.६ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, एवढी गर्दी असताना जेव्हा गरज होती तेव्हा तिला कोणीच मदत करायला आलं नाही, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “स्नॅचर्स खूप वाढत चालले आहेत. पंजाबी लोक त्यांच्या घरासमोरही सुरक्षित नाहीत. सरकार काय करतंय??” तर तिसऱ्याने “खूप धक्कादायक घटना” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “तिला फोन तिच्या आयुष्यापेक्षा महत्त्वाचा होता.”

दरम्यान, द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, लुधियाना पोलिसांनी फोन स्नॅचरला पकडण्यात आले असून त्या आरोपीचे नाव पवनदीप कुमार असल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shocking video of thief snatches phone from young girls hand drags her on street ludhiana video viral on social media dvr