Shocking video: किंग कोब्रा असं नाव ऐकलं तरी अनेकांच्या काळजात धस्स होतं. सापांमधील सर्वात विषारी नाग म्हणून किंग कोब्राला ओळखलं जातं. या सापाचा एक दंश जरी झाला तरी व्यक्तीचा जागीच मृत्यू होते. अशा भयंकर विषारी सापासोबत स्टंट करणे म्हणजे स्वताहून मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे आहे.किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही.

काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा सापाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.सध्या सोशल मीडियावर किंग कोब्रासह स्टंटबाजी करतानाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं किंग कोब्रा नागाला थेट आपल्या तोंडात पकडलं आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एक किंग कोब्रा बसल्याचे दिसते. त्याला पकडण्यासाठी काका हातात एक पिशवी घेऊन येतात. ते कोब्राला पकडायला जातात खरं पण तितक्यातच कोब्रा आपला फणा पसरवून काकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यांनतर पुढे असं काही घडत ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात काका कोब्राला पुढच्याच क्षणी किस करताना दिसून येतात. हे कोब्राला हातात घेतात आणि त्याचे तोंड थेट आपल्या तोंडात टाकतात. त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी कोणतीही भीती नसते मात्र हे अशाप्रकारे स्टंटबाजी करणे जीवावर बेतू शकते.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.