Truck Accident Viral Video: रस्त्यावर चालताना आपण कितीही सावध असलो तरी अपघात कधी, कुठून घडेल याचा नेम नाही. विशेषत: ट्रकसारख्या मोठ्या वाहनांपासून नेहमीच अंतर ठेवायला हवं. कारण- क्षणभराची चूकही जीवावर बेतू शकते. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहून लोकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले आहेत.
रस्त्यावरून सरळ चालणं किती धोकादायक ठरू शकतं, याचं एक थरारक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. काही सेकंदांच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा केला आहे. ट्रक, स्कुटी आणि एका तरुणीचा जीवघेणा क्षण… डोळ्यांसमोर काळजात धडकी भरवतो. क्षणभर असं वाटतं की, तिचं आयुष्य तिथेच संपलं; पण पुढच्या फ्रेममध्ये जे घडलं, ते पाहून सगळे थक्क झाले. ट्रकखाली जाऊनही ती मुलगी कशी काय वाचली, हा प्रश्न प्रत्येकाला हादरवून सोडतोय. आता हा धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होतोय आणि नेटकरी फक्त एकच म्हणतायत – “ही खरी देवाची कृपा!’
व्हिडीओमध्ये दिसतंय की, रस्त्यावर प्रचंड ‘जाम‘ लागलेला आहे. गाड्या हळूहळू पुढे सरकत आहेत. त्याच गाड्यांच्या रांगेत एका स्कुटीवर बसलेली तरुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात मागून येणाऱ्या एका ट्रकचालकानं अचानक गाडीचा वेग वाढवला आणि थेट त्या मुलीच्या स्कुटीवरून ट्रक पुढे नेण्याचा प्रकार घडला. क्षणभर वाटलं आता तरुणीचा जीव जाणारच…
पण प्रसंग असा की, ती मुलगी ट्रकखाली अडकली; पण चाकांखाली आली नाही आणि त्यामुळे ती थोडक्यात वाचली. जर ती चाकांच्या अगदी जवळ असती, तर त्या क्षणीच तिचा अंत झाला असता. हा थरारक क्षण पाहताना कोणाच्याही अंगावर काटा येईल इतका तो भीषण आहे.
हा व्हिडीओ ट्विटर (एक्स)वर @IAmHurr07 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या १३ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शेकडो लोकांनी हा व्हिडीओ लाईक करून, विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिले, “बेचारीची स्कुटी तर चक्काचूर झाली; पण वरून बोलावणं आलं नाही तोवर कुणी काही करू शकत नाही”. दुसऱ्याने सल्ला दिला, “मोटरसायकल किंवा स्कुटीवाल्यांनी ट्रकच्या इतक्या जवळून जायला नको. ट्रक उंच असतात आणि ड्रायव्हरला दिसत नाही.”
तर अनेकांनी ट्रकचालकावर संताप व्यक्त करीत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकाने स्पष्ट लिहिले – “अशा घटिया ड्रायव्हरला कडक शिक्षा झालीच पाहिजे!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ एक धडा देतो – रस्त्यावर क्षणभराची बेपर्वाईही तुमच्या जीवावर बेतणारी ठरू शकते. तेव्हा सावध राहा, सुरक्षित राहा!