Shocking Viral Video : जगात अशी अनेक रहस्यमय आणि अद्भुत ठिकाणं आहेत, जी अजूनही लोकांच्या नजरेपासून लपलेली आहेत. पण, जेव्हा कोणी या ठिकाणांचा शोध घेतो तेव्हा त्या ठिकाणांचे फोटो व्हिडीओ जगासमोर येतात. त्यातून केवळ उत्साहच नाही, तर उत्सुकताही निर्माण होते. जर्मन कंटेंड क्रिएटर कार्स्टेन रॉबर्ट हे रहस्यमय गोष्टींच्या शोधांसाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी स्युअर लाइनमधील रहस्यमय जग उघड करून नेटकऱ्यांना धक्का दिला आहे.

रहस्यमय गुहा, खंदक किंवा जुन्या वास्तूंचा शोध घेतल्याने आपल्याला केवळ भूतकाळाची झलकच मिळत नाही, तर काळानुसार गोष्टी किती बदलल्या आहेत आणि काय मागे राहिले आहे हेदेखील कळते. दरम्यान, कार्स्टेन यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान लपलेल्या भूमिगत रुग्णालयाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे.

भूमिगत रुग्णालयाचे भयानक दृश्यात मंद प्रकाश असलेले कॉरिडॉर, भिंतींवर भुताटकीचे भित्तीचित्र… ऑपरेटिंग लाइटखाली जीर्ण झालेले स्ट्रेचर, असंख्य खोल्या आणि जमिनीवर विखुरलेल्या भूतकाळातील भयानक वस्तू. कार्स्टेन यांच्या भयानक शोधाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

हा व्हिडीओ @losthistorie या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. काही नेटकऱ्यांनी हा एखाद्या हॉरर व्हिडीओ गेमसारखा असल्याचे म्हटले; तर काहींना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. एका युजरने लिहिले की, ही जागा खूपच भयानक आहे. दुसऱ्याने लिहिले की, जर हे खरोखरच रुग्णालय असते, तर त्यांनी पीडितांना अंधाऱ्या गटारात कसे उतरवले असते. तिसऱ्या एकाने लिहिले की, हॉस्पिटलमधील हे दृश्य मला ‘लास्ट ऑफ अस’ या वेब सीरिजची आठवण करून देते.