Viral video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात काही रडवतात तर काही व्हिडीओ पाहून पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला आश्चर्य वाटेल मात्र काही वेळानंतर तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. असं काय आहे व्हिडीओमध्ये आणि काय प्रकार घडला हे तुम्हीच पाहा..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हिडीओ कोटा येथील बॉईज हॉस्टेलचा असल्याचे सांगण्यात येत आहे, जिथे एका मुलाने त्याच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही तेव्हा त्याच्या इतर मित्रांनी पोलिसांना बोलावले. बराच वेळ दरावाजा वाजवूनही आतमधून काहीही उत्तर मिळत नव्हतं, यावेळी आतमध्ये असलेल्या तरुणाची सगळ्यांना चिंता वाटू लागली. यावेळी त्यांना तरुणीने स्वत:च्या जीवाचं बरं-वाईट तर नाही केलं ना अशी शंका आली. त्यानंतर पोलीस आले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर दरवाजा उघडण्यात पोलिसांना यश आले, मात्र त्यांनी पुढे जे पाहिले ते पाहून एकच हशा पिकला. कारण हा तरुण बेडवर आरामात झोपला होता. यामुळेच तो दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा न उघडल्याने त्याने काहीतरी चुकीचे पाऊल उचलले असावे असे सर्वांना वाटले. मात्र तरुण गाढ झोपेत होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लोकांच्या जीवाशी खेळ! गाजर विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; भाजी विक्रेत्यांचा घृणास्पद VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rose_k01 नावाच्या युजरने शेअर केला आहे.हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना हसू अनावर झालंय. यावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “तो जिवंत आहे हे जाणून आनंद झाला, पण त्याला बाहेरचा आवाज आला नाही का?” दुसऱ्या युजरने लिहिले की, “क्षणभर असे वाटले की अभ्यासाच्या दबावाखाली त्या व्यक्तीने हे पाऊल उचलले आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “हे सर्व पाहून खूप भीती वाटते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student locked himself in room friends immediately called police watch what happened next srk