सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांचा खोडकरपणा, निरागसपणा आपल्याला पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दाढी करून आलेल्या आपल्या वडिलांना पाहताच चिमुरड्याने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ती पाहून नेटकरी देखील फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बापाला पाहून चिमुरडा रडू लागला..

हा व्हिडीओ खूपच गोंडस आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लांब दाढी आणि मिशा असलेला बाप उशीने चेहरा झाकून मुलाशी खेळत आहे. हा खेळ तो मुलासोबत पुन्हा पुन्हा खेळतो. कधी तो चेहरा झाकतो तर कधी पटकन समोर येतो, हे पाहून चिमुरडा देखील आनंदाने हसत आहे. पण दुसर्‍याच क्षणी त्याचे वडील दाढी-मिशी काढून येतात आणि पुन्हा गेम खेळू लागतात. आधी चिमुरडा वडील पुन्हा खेळायला आले म्हणून खुश असतो. पण अचानक त्यांचा चेहरा पाहून त्यालाही धक्का बसतो. त्याने एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहिलंय असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटते. दाढी करून आलेला वडिलांना तो ओळखू शकला नाही. आणि त्यांना पाहून घाबरून तो रडू लागतो.

( हे ही वाचा: Video: मुंबई लास्ट लोकलमध्ये ‘या’ २ तरुणांवर प्रवासी झाले फिदा, लोकलमध्ये असं काही घडलं….)

व्हिडिओतील मुलाच्या प्रतिक्रियेने सर्वच लोकं भारावून गेले. त्याच्या निरागसपणाने लोकांचे मन जिंकले. या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच अनेकजण या व्हिडिओला शेअर देखील करत आहेत. काहीजणांना हा व्हिडीओ इतका आवडलाय की ते या व्हिडीओवर कंमेंट देखील करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Such a scared child his father without a beard see reaction people obsessed with innocence gps