८ मे या दिवशी जागतिक मातृदिन साजरा केला जातो. यावेळी आपल्या आईच्या कष्टांचे कौतुक करण्यात येते आणि आभार व्यक्त करण्यात येते. यंदाच्या मदर्स डेच्या निमित्ताने, इंटरनेट युजर्सनी या प्रेरणादायी महिलेचे जोरदार कौतुक केले. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की एक दिव्यांग महिला अनेक आव्हानांना न जुमानता आपल्या बाळाची चांगली काळजी घेत आहे. व्हिडीओमध्ये बेल्जियमची कलाकार साराह तालबी दिसत आहे, जी हाताशिवाय जन्मली होती. या महिलेच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला हा व्हिडीओ अजूनही व्हायरल होत आहे.
सारा तालबीने तिच्या सबस्क्रायबर्स दाखवले की ती हातांशिवाय तिच्या बाळाची काळजी कशी घेते. ती अजूनही तिच्या आयुष्याविषयी नियमित अपडेट्स देते. ती रोजची घरातील कामे कशी करते आणि लहान मुलीसोबत गुंतलेली असते, हे ती आपल्या व्हिडीओमधून सांगते. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी मदर्स डेच्या निमित्ताने ट्विटरवर पुन्हा शेअर केला आहे.
“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर
त्या अधिकाऱ्याने लिहिले, ‘आईपेक्षा मोठा योद्धा कोणीच नाही, हे अगदी बरोबर आहे. #MothersDay निमित्त, सर्व मातांचे मनःपूर्वक अभिनंदन ज्यांनी आपल्या मुलांना प्रेम, प्रेरणा आणि मूल्यांचे सिंचन करून सक्षम केले.”
ट्विटरवर या व्हिडीओला एक लाख १४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ८,५०० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हात नसतानाही आपल्या मुलाची आणि स्वतःची काळजी घेतल्याबद्दल शेकडो लोकांनी या धाडसी आईचे कौतुक केले. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.