Cute Girl Viral Video: सोशल मिडिया हा आजच्या काळातील अविभाज्य भाग झाला आहे. लहान मुलांनाही आता सोशल मीडियाची आवड आहे. एवढंच नाही तर मुलं टॅलेंटच्या बाबतीत सोशल मीडियाव मोठ्यांनाही मागे टाकतायत. मग ते गाणं गायचं असो, डान्स असो किंवा अभिनय — या छोट्या हुशार मुलांसाठी काहीच अवघड नाही! किर्ती लहान पण मुर्ती महान! अशी वृत्ती असलेली अशीच एक गोंडस चिमुकली सध्या चर्चेत आली आहे. तिला अजून स्पष्ट बोलताही येत नाही पण तरी तिचा आत्मविश्वास कमालीचा आहे. ही चिमुकली अंदाजे दोन-तीन वर्षांची असावी पण तब्बल ६५ वर्षांपूर्वीच्या ‘बरखा’ चित्रपटातील ‘तडपाओगे… तडपा लो…’ हे गाणे गात आहे. आपल्या गोंडस आणि हटके अंदाजमध्ये गाणे गाणाऱ्या चिमुकलीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
‘तडपाओगे… तडपा लो ‘ गाणाऱ्या चिमुकली व्हिडिओ चर्चेत
सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होतात पण मोजकेच असे असतात जे नेटकऱ्यांच्या मनात स्थान मिळवतात. व्हायरल व्हिडिओमध्ये ही चिमुकली अत्यंत गोडस आहे. तिने पांढर्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. कपाळावर लाल रंगाची टिकली लावली आहे. गोंडस हसू चेहऱ्यावर ठेवून ती ‘तडपाओगे… तडपा लो…’ या गाणे गात आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत मोहक आहेत, पण ती “तडपा लो”ऐवजी “तडपालम” म्हणते, आणि तिच्या ह्याच निरागस उच्चारामुळे व्हिडिओ भन्नाट व्हायरल झालाय! लोक तिच्या या गोंडस चुकीवर अक्षरशः फिदा झालेत. हा व्हिडिओमध्ये चिमुकलीने लिप सिंक केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे पण हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि त्यांना तो आवडलाही. सोशल मीडियावर अनेकांही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या छोट्या गायिकेच्या गोंडस अभिनयावर सगळीकडून प्रेमाचा पाऊस पडतोय. कुणी म्हणतं, “इतकी गोड की पुन्हा पुन्हा बघावं वाटतंय,” तर कुणी म्हणतं, “तडपालम हेच आता आमचं आवडतं गाण झालंय!
एकाने लिहीले की, तडपाओगी… तडपा लो नव्हे तडपाओगी… तडपालम हेच बरोबर आहे.
दुसऱ्याने लिहिले की, “तिचा आवाज, तिचा निरासपणा,,,,सर्व काही किती गोड आहे”
