Wildlife Viral Video: जंगलामधील दाट काळोखात भरून राहिलेली भयाण शांतता … अचानक झुडपांमधून एक चमकदार डोळ्यांची जोडी सरळ समोर येते. क्षणभरात लक्षात येतं हा कोणी साधा प्राणी नाही, तर… हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही सेकंदांचा तणाव प्रत्येक पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणतो. पुढच्या क्षणात काय झालं, ते पाहून तुमचेही श्वास रोखले जातील…नेमकं काय घडलं जाणून घ्या…
सोशल मीडियावर सध्या एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. जंगलातील एका थरारक घटनेचे दृश्य त्यात पाहायला मिळतं. व्हिडीओच्या सुरुवातीला दिसतं की, एक वनकर्मी रात्रीच्या अंधारात जंगलात गस्त घालण्यासाठी निघाला आहे. चारही बाजूंना दाट अंधार, फक्त पानांची सळसळ अशा वातावरणात तो शांतपणे पुढे जात होता. मात्र, त्याला कल्पनाही नव्हती की, त्याच दिशेनं एक भलामोठा वाघ दबक्या पावलांनी त्याच्याकडे सरकत आहे.
क्षणभरात गोठलं सारं…
वनकर्मी हळूहळू जंगलाच्या एका कंपाऊंडच्या बाउंड्रीकडे पोहोचतो, तेव्हा अचानक त्याच्या नजरेसमोर काहीतरी हलतं. पुढच्या क्षणाला त्याचे डोळे सरळ वाघाच्या चमकत्या डोळ्यांना भिडतात. त्या नजरेत एक विचित्र तेज, अंगावर काटा आणणारा थंडपणा… पाहताक्षणीच वनकर्मीचा घसा कोरडा पडतो. पण, गंमत म्हणजे वाघही त्याच्याप्रमाणेच थबकला. तेथे एक क्षण असा आला की, जणू वेळ थांबला होता ना हालचाल, ना आवाज… फक्त दोघांची नजरानजर आणि दडपणयुक्त शांतता.
धावले दोघेही; पण विरुद्ध दिशेला!
त्या थरारक क्षणी पहिल्यांदा भानावर आलेला वनकर्मी वेगाने मागे वळून धाव घेतो. अगदी त्याच वेळी वाघही उलट्या दिशेने पळ काढतो. काही सेकंदांतच दोघे नजरेआड होतात. हा सगळा प्रसंग तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ
हा अविश्वसनीय व्हिडीओ ‘ghantaa’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हजारो लोकांनी तो पाहिला आहे. जंगलातील अनपेक्षित धोक्यांची अशा रीतीने खरी ओळख देणारा हा क्षण पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. “रात्री जंगलात कोणते प्रसंग घडू शकतात, याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही”, असं अनेक नेटिझन्सचं म्हणणं आहे.
हा व्हिडीओ पाहताना तुमचेही डोळे विस्फारतील…
शेवटपर्यंत पाहा आणि स्वतः ठरवा – रात्री जंगलात गस्त घालणं म्हणजे धाडस की वेडेपणा?