मालकाची गादी चोरण्याचा लहानग्या हत्तीचा गोंडस प्रयत्न कॅमेरामध्ये कैद; हा Viral Video जिंकेल तुमचेही मन

भारतीय वन अधिकारी डॉ. सम्राट गौडा यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

The cute little elephant attempt to steal the owner mattress captured on camera
हत्तीचे पिल्लू आणि या व्यक्तीमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला आहे. (Photo : Twitter/@IfsSamrat)

हत्ती हे अत्यंत बुद्धिमान प्राणी असून त्यांची माणसांसोबतची मैत्री खूपच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर हत्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचे बाळ रुसलेले दिसत आहे. त्यांना पाळणाऱ्या एका व्यक्तीने या पिल्लाची खोड काढली आहे. त्यामुळे हत्तीचे पिल्लू आणि या व्यक्तीमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला आहे.

ट्विटरवर हृदयस्पर्शी प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी लोकप्रिय असलेले भारतीय वन अधिकारी डॉ. सम्राट गौडा यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “हा माझा बिछाना आहे” या कॅप्शनसह या आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला आपण पाहू शकतो की हत्तीचे बाळ कशापद्धतीने कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याच्या आकारामुळे त्याला उडी मारून हे कुंपण ओलांडणे शक्य होत नाही आणि हे करताना त्याची धडपड होत आहे.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

एकदा हे कुंपण ओलांडल्यावर हे पिल्लू धावतच त्याच्या बिछान्यावर झोपलेल्या माणसाकडे जाते आणि त्याला बिछान्यावरून उठवण्याचा प्रयत्न करते. हा व्यक्ती गमतीने हत्तीच्या पिल्लासोबत तो बिछाना वाटून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र पिल्लू त्याला दाद देत नाही हे पाहिल्यावर हा व्यक्ती पुन्हा बिछान्यावर झोपतो आणि पिल्लाला पालापाचोळ्याचा ढकलतो. हत्ती काही सेकंद ढिगाऱ्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आणि नंतर पुन्हा आपल्या बिछान्याकडे जातो.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

या गोड व्हिडीओच्या शेवटी हा व्यक्ती आणि हत्तीचे पिल्लू एकमेकांना मिठी मारून या बिछान्यावर झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून, या व्हिडीओला १.८२ लाखांहून अधिक व्ह्यूज, १२,५०० लाइक्स आणि २,८०० हून अधिक रिट्विट्स आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The cute little elephant attempt to steal the owner mattress captured on camera this viral video will win your heart too pvp

Next Story
Optical Illusion : या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिलं यावरून कळेल लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात
फोटो गॅलरी