Little Girl Dance: आजकालची लहान मुलं कधीही काय करतील हे सांगता येत नाही. लहान वयातच त्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान असतं. त्यामुळे आपल्या आवडी-निवडी, आपले आवडते छंदही त्यांना लवकर कळतात; ज्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे ते लहानपणापासूनच ठरवतात. सोशल मीडियावर अशा अनेक लहान मुलांचे व्हिडीओ आपण पाहिले असतील. त्यामध्ये ते त्यांची कला सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियामुळे लहान मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग्ज मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता व आकर्षण आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक जण तिच्या डान्सचं कौतुक करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली गुटर्रSS गुटर्रS या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करीत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स अधिक लक्ष वेधून घेत आहेत. हा जबरदस्त डान्स पाहून युजर्सही अवाक् झाले आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत सात दशलक्षाहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत; तर दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “खूप सुंदर मुली.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “जबरदस्त डान्स.” आणखी एकानं लिहिलंय,”‘एक नंबर डान्स.” आणखी एकानं लिहिलंय, “खतरनाक डान्स, एकदम भारी.”