Bull Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात काही मजेशीर व्हिडीओ आपण पाहतो. त्यात अनेकदा प्राण्यांचे खूप मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. पण, बऱ्याचदा काही व्हिडीओ असेही असतात, जे पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुमचादेखील थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बैल हा एक असा प्राणी आहे की जो खवळला तर कधीही काहीही करू शकतो. अशा वेळी त्याला नियंत्रणात ठेवणंदेखील खूप कठीण असतं. मागील काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील अशाच एका बैलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्यानं अनेकांवर हल्ला केल्याचं दिसलं होतं. या प्रकरणानंतर आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात तो बैल असं काहीतरी करतोय जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं म्हटलं जात असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक उधळलेला बैल रस्त्यावर पळताना दिसत आहे. बैल रस्त्यावर पळत असल्याचे पाहून सर्व गाडीचालक सुसाट वेगाने जात आहेत. पण, तेवढ्यात अचानक एका बाईकच्या मागे तो बैल लागतो. यावेळी त्या बाईकवर दोन व्यक्ती बसल्या होत्या. बैल त्यांच्या मागे जाऊन उभा राहतो आणि मागे बसलेल्या व्यक्तीला शिंगाने ढकलण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @doaba_x08 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज आणि सहा मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक जण कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘रीलसाठी जीवाची बाजी…’ स्केटबोर्डवरून उंच उडी मारणं पडलं महागात; VIDEO पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, “बैल म्हणत असेल तू बस मी धक्का मारतो”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “पेट्रोल संपलं असेल म्हणून धक्का मारतोय”, तर आणखी एकानं लिहिलंय, “बापरे खूपच भयानक आहे हा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बाबा तुझं नशीब खराब आहे वाटतं.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The rampaging bull hit the biker you will get shocked after seeing the video sap