सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव उत्साहात साजरा होताना दिसतो आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. तसेच आजचा रंग पिवळा आहे. नवरात्रीत गरबा खेळताना लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जण विशिष्ट आणि अनोख्या स्टेप्स करतात, तर काही जण दांडिया खेळण्यास पसंती दाखवतात; तर काही जणांना अगदीच साधा गरबा आवडतो. आज सोशल मीडियावर गावाकडचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात लहान मुलं, तरुण मंडळी नाही तर आजोबांचा ग्रुप अनोखा गरबा खेळताना दिसले आहेत; जो तुम्ही आजवर कधीच पाहिला नसेल.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. गावात आजोबांचा एक ग्रुप गरबा खेळताना दिसत आहे. सर्व आजोबा मैदानात वर्तुळाकार उभे आहेत आणि त्यांच्या दोन-दोन अशा जोड्या करण्यात आल्या आहेत. सगळ्या आजोबांच्या दोन्ही हातात टिपऱ्या आहेत. तसेच टिपऱ्यांच्या मदतीने गरबा खेळण्यात येतो आहे. तसेच गरब्याचे प्रसिद्ध गाणं “मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे’ हे गाणं वाजत आहे आणि या तालावर आजोबांचा ग्रुप अगदीच छान गरबा खेळताना दिसत आहे. गावाकडच्या आजोबांचा टिपऱ्यांचा गरबा एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…आयुष्य हे खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे; वृद्ध व्यक्तीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

टिपऱ्या, गरबा आणि खास वेशभूषा :

आतापर्यंत तुम्ही तरुण मंडळी, लहान मुले यांना गरबा खेळताना पाहिलं असेल, तर आज आजोबांच्या ग्रुपने गरबा खेळून या सर्वांना मागे टाकलं आहे.
टिपऱ्यांच्या मदतीने गरबा खेळणाऱ्या सर्व आजोबांनी पांढरी महाराष्ट्रीयन टोपी, पांढरी धोती आणि कुर्ता घातला आहे. तसेच सर्व आजोबा गाण्याच्या तालावर एकसाथ पावलं टाकत आहेत व त्या दरम्यान त्यांच्या टिपऱ्यांच्या हालचालीसुद्धा अगदी चोख होताना दिसत आहेत. तसेच टिपरीच्या मदतीने करण्यात येणाऱ्या त्यांच्या अनोख्या स्टेप्ससुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या दरम्यान सगळ्याच आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद तुमचेही मन जिंकेल. अशाप्रकारे आजोबांच्या ग्रुपचा अनोखा गरबा गावाकडे रंगला आहे.

सोशल मीडियावर @marathiepicjokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसेच ‘या मित्रांनो टिपऱ्या खेळायला’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून ‘भारी आजोबा, खूप छान’, ‘खूप छान वाटतंय या सर्व आजोबांना बघून’, ‘ओरिजिनल गरबा’; अशा अनेक कमेंट तरुण मंडळी करताना दिसत आहेत. तसेच संस्कृती आणि परंपरा जपून गरबा खेळण्यात आलेला अनेकांना खूप आवडला आहे, असे ते कमेंटमध्ये सांगताना दिसले आहेत.