पाणी हे जीवन आहे, ‘पाण्यासाठी कधी कोणाला नाही म्हणू नये’ हे वाक्य लहानपणापासून अनेकदा आपण ऐकलं असेल. घरात पाहुणे आले किंवा एखादा व्यक्ती पार्सल घेऊन आणि तो दमलेला दिसला, तर आपण लगेच त्याला एक ग्लास पाणी देतो. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात जंगलातील तहानलेल्या रेड्याला एका महिलेने न घाबरता चार घागरी पाणी दिलं आहे; हे बघून अनेक जण तिचं कौतुक करताना दिसून आले आहेत.
व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. महिलेच्या घरासमोर एक रेडा उभा आहे आणि त्याला तहान लागली आहे. तसेच महिला न घाबरता भांड्यात त्याला पिण्यास पाणी देते. तसेच तहानलेला रेडा शांतपणे भांड्यात दिलेलं पाणी पिताना दिसतो आहे. व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, महिला फक्त एकदा पाणी देऊन निघून जात नाही, तर रेड्याचे पाणी पिऊन झाल्यानंतर ती पुन्हा रिकाम्या झालेल्या भांड्यात घागर भरून पाणी ओतताना दिसते आहे. गावाकडची माणसं कशाप्रकारे प्राण्यांना जीव लावतात हे या व्हिडीओत दिसून आले आहे. रेड्याला न घाबरता पाणी देणाऱ्या महिलेचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
महिलेची दया पाहून कराल कौतुक :
गावाकडे राहणाऱ्या स्थानिक लोकांना वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. प्राण्यांना जंगलात अन्न पाणी मिळाले नाही की, अनेकदा वन्य प्राणी अन्न पाण्याच्या शोधात स्थानिक लोकांच्या घरांच्या आसपास वावरताना दिसतात. तर या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. रेडा या प्राण्याला तहान लागलेली असते म्हणून तो महिलेच्या घरापाशी उभा आहे आणि महिला रेडा या प्राण्याला चार घागरी भरून पाणी प्यायला देते. तसेच सुरक्षित अंतरसुद्धा ठेवते, जे तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल. तसेच आयएफएस (IFS) अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडीओ पाहून एक मोलाचा संदेश दिला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी यांच्या @sudhaRamenIFS अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून वन्य प्राण्यांबद्दल सहानुभूती असणे गरजेचं आहे. परंतु, आपण हे कधीही विसरू नये की, वन्य प्राण्यांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाऊ शकत नाही. त्यांच्यापासून अंतर राखणे नेहमीच सुरक्षित असते. असा मोलाचा आणि महत्वाचा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक जण महिलेचे कौतुक करताना आणि विविध प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.