सोशल मीडियावर आपण अनेक मजेदार व्हिडीओ पाहत असतो. बरेच व्हिडीओ तर असे असतात की ते पाहिल्यानंतर आपण कितीतरी वेळ हसत असतो. आजच्या तरुणाईला धोकादायक स्टंट करून दाखवण्याची हौस जडली आहे. असे करून त्यांना लोकांकडून कौतुक करून घ्यायचे असते. यामध्ये त्यांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो आणि त्याचे स्टंट त्यांनाच महागात पडतात. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा खाटेसह स्टंट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यादरम्यान मुलासोबत असे काही घडते, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधी स्टंट करण्याचा विचारही करणार नाही. हा व्हिडीओ खूपच आश्चर्यकारक असून सोबतच हा व्हिडीओ बघायला मजाही येते.

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकर पाकिस्तानसाठी भारताविरुद्ध मैदानात उतरला होता! नेमकं असं काय घडलं होतं?

Viral Photo : वृद्ध महिलेला खांद्यावर उचलून केला ५ किमी पायी प्रवास; महिला पोलिसाच्या कृतीने नेटकऱ्यांची जिंकली मनं

व्हिडीओमध्ये तुम्ही एक लहान मुलगा पाहू शकता. ज्याने चष्मा घातलेला आहे. मुलाच्या अंगणात खाट ठेवलेली दिसते. या खातेसोबत तो स्टंट करण्याचा विचार करतो. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलगा त्या खाटेवरून खूप जोरात उडी मारतो. वास्तविक, तो उडी मारून खाट ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, तो खाटेच्या पलीकडे झुकताच जोरात जमिनीवर आदळतो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की तो मुलगा तोंडावर जमिनीवर पडला. मुलगा इतक्या वाईट रीतीने तोंडावर पडतो की पडताच त्याच्या चष्म्याचे २ तुकडे होतात. यानंतर तो किती जोरात पडला असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. त्याला खूप दुखापत झाली असावी. हा व्हिडीओ preetsoe2 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत साडे पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This boy fell on his face while doing stunt watch the viral video pvp