टायगर श्रॉफने केला अफलातून गोल; नेटकऱ्यांनी केली Ronaldo-Messi सोबत तुलना; पाहा Viral Video

अलीकडेच टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फुटबॉल सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

tiger shroff playing football
टायगर श्रॉफ हा फुटबॉलप्रेमी आहे. (Photo : Instagram/@tigerjackieshroff)

Tiger Shroff Playing Football: बॉलिवूडचा अ‍ॅक्शन किंग म्हटला जाणारा टायगर श्रॉफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या लूक आणि फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतलेल्या टायगर श्रॉफला खेळातही खूप रस आहे. त्याचवेळी, नुकताच टायगरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे ज्यामध्ये तो फुटबॉल खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक इतके प्रभावित झाले की त्यांनी अभिनेत्याची तुलना फुटबॉल सुपरस्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीशी केली.

टायगर श्रॉफ हा फुटबॉलप्रेमी आहे. तो क्वचितच त्याच्या मोकळ्या वेळेत एखादा सामना चुकवत असेल. अलीकडेच टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फुटबॉल सामन्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे फुटबॉल खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, टायगर खूप वेगाने येतो आणि पायाने चेंडू ढकलत पुढे जाऊन गोलही करतो. त्याचवेळी त्याच्यासोबत मैदानावर उपस्थित असलेले लोक फक्त त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहतात.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

टायगर श्रॉफच्या व्हिडीओतील शानदार गोल पाहून सोशल मीडियावर फुटबॉल चाहते त्याची तुलना प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी करत आहेत. टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tiger shroff scored a hurricane goal netizens compared him with ronaldo messi watch viral video pvp

Next Story
Maharashtra Political Crisis: “…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”, शेतकऱ्याचं राज्यपालांना पत्र; कारण वाचून वाटेल आश्चर्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी