Train Viral Video: रेल्वेचे संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रेल्वेतील मजेशीर व्हिडीओ, तर रेल्वेतील भयानक गर्दीचे व्हिडीओ, कधी रेल्वे अपघाताचे व्हिडीओ तर रेल्वे प्रवासादरम्यानचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकदा अंगावर काटा येतो. अनेक लोक जीवघेणा प्रवास करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या खाली पडलेली दिसते आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आजच्या काळात लोकांच्या डोक्यावर स्टंटचे असे भूत आहे की, त्यांना त्यांच्या जीवाची काळजीही नसते. नियम मोडणं हा प्रकार काही लोकं जाणून बुजून करतात. रेल्वे स्टेशनवर हा प्रकार खूप दिसतो. रीतसर पलीकडे जायचा मार्ग असताना सुद्धा लोकं कधी कधी रेल्वे रुळावरून पलीकडे जातात. आळशी असतात की मजा येते हे काय अद्याप समजू शकलेलं नाही. पण बरेचदा हा स्टंट जीवावर बेततो. या घटनांचे व्हिडीओ सुद्धा प्रचंड व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती धावत्या ट्रेनच्या खाली जीवन आणि मृत्यूशी लढताना दिसली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकही आश्चर्यचकित झाले.

(हे ही वाचा : धावत्या रेल्वेतील डान्स बंद झाल्यानंतर ट्रेनमध्ये घडला ‘हा’ नवा प्रकार; व्हिडीओ वेगाने व्हायरल, नेमके घडले काय? )

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रेनच्या खाली अडकलेली दिसत आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रेन वेगाने धावते आहे. ती व्यक्ती ट्रॅकच्यादरम्यान स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ट्रेन लांब आहे आणि भरधाव वेगाने येताना दिसत आहे. त्या व्यक्तीला काय करावे, हे समजत नाही. जेव्हा ट्रेनची गती किंचित कमी होते, तेव्हा त्या व्यक्तीने आधी आपली बॅग बाहेर फेकली आणि स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती व्यक्ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ट्रेनच्या मागील चाक त्याच्या डोक्याजवळ येते, ती व्यक्ती त्वरित डोके खाली करते, परंतु ती व्यक्ती पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. यावेळी ती व्यक्ती सुखरुप बाहेर पडते आणि आपला जीव वाचवते. तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या मित्राने त्याचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि व्हायरल झाला, असल्याची माहिती आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/crazyclipsonly/status/1793201633733599547?ref_src

हा व्हिडीओ @crazyclipsonly नावाच्या खात्यातून एक्सवर सामायिक केला आहे. हा व्हिडीओ सुमारे दोन कोटी लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, “अशा धावत्या ट्रेनमधून बाहेर पडणे धोकादायक असू शकते.” दुसर्‍याने लिहिले की, “व्हिडीओ पाहून मला आश्चर्य वाटले.” अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.