गेल्या काही काळात सोशल मीडियाचा प्रभाव कमालीचा वाढला आहे. लोक अगदी वाट्टेल तिथे व्हिडीओ शूट करताना दिसतायत. सोशल मीडियावर रोज काही ना काही पाहायला मिळते. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुम्हीही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. रील्स बनविण्यासाठी व ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असतात. एक वेळ अशी आली की, प्रत्येक जण ट्रेनमध्ये नाचण्याची स्वतःची रील बनवायचा आणि नंतर ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करायचा. ट्रेनमध्ये नाचणाऱ्यांमध्ये बहुतेक मुलीच होत्या. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर राग अनावर झाल्याने लोकांनी कमेंट्समधून त्यांच्यावर टीका केली. आता अशा डान्सचे व्हिडीओ व्हायरल होणे बंद झाले असून, नवीन नाटकांचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.

काही दिवसांपासून चालत्या ट्रेनमध्ये रील बनविण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दीची पर्वा न करता, अनेक जण डान्सचे व्हिडीओ बनवीत आहेत. अशा लोकांविरोधात कारवाईची मागणी केली जात असतानाही हा गैरप्रकार थांबायचे नाव घेत नाही. काही इन्फ्लुएन्सर्स तर गर्दीचीही पर्वा करीत नाहीत. प्रवाशांना अगदी धक्के मारून ते डान्स करीत असतात. अशा व्हिडीओंविरोधात अनेकदा टीका केली जाते. प्रशासनाकडे तक्रारही केली जाते. काही जणांना तर शिक्षादेखील झालीये. तरीही सोशल मीडियाचं वेड काही लोकांना शांत बसूच देत नाही. आता काही प्रमाणात हा प्रकार बंद झालेला दिसतोय. पण, आता रेल्वेमधील एका तरुणीनं डान्स बंद झाल्यानं नवीनच कृत्य केलं असल्याचं सोशल मीडियाद्वारे समोर आलं आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Central Railway disrupted due to technical glitch
Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
A religious twist in the case of assaulting a ticket inspector on the Western Railway Mumbai
मुंबई: तिकीट तपासनीसला मारहाण प्रकरणाला धार्मिक वळण
Railway transport services disrupted due to agitation at Badlapur
बदलापूर-कर्जत रेल्वे वाहतूक ठप्पच, सहा तासानंतरही ठिय्या आंदोलन कायम
Ticket inspector beaten, Borivali Railway Police Station,
मुंबई : प्रवाशाकडून तिकीट तपासनीसला मारहाण, बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai, Western Railway, heart attack, Automated External Defibrillator (AED),
रेल्वे स्थानकात हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ प्रथमोपचार
cet result marathi news
बीएमएस, बीबीएमच्या अतिरिक्त सीईटीचा निकाल २८ ऑगस्ट रोजी ? निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया होणार सुरू

(हे ही वाचा : VIDEO: माशाच्या नादाला लागणं मगरीला महागात पडलं; १८ सेकंदात घडवली आयुष्यभराची अद्दल, पाण्यात नेमकं घडलं काय?)

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

ट्रेन कशासाठी आहे? हे स्पष्ट आहे की, ट्रेन लोकांच्या प्रवास सुविधेसाठी आहेत; पण काही लोक ट्रेनचा वेगळ्या पद्धतीने वापर करताना दिसतात. पूर्वी लोक ट्रेनमध्ये नाचून रील बनवत असत. आता ते बंद झाल्यानं नवीन कृती सुरू झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या स्लीपर कोचमधील वरच्या सीटवर पुश-अप करीत आहे. त्यानंतर ती दोन सीटदरम्यान लटकून एबीएस व्यायाम करू लागते. जिममध्ये किंवा घरी करावयाची कृती ही मुलगी ट्रेनमध्ये करताना दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://x.com/Siya17082000/status/1792870893393170867?ref_src

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Siya17082000 नावाच्या खात्यावरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. हे वृत्त लिहेपर्यंत सहा हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.