Viral Post Swiggy Delivery Boy’s Kind Act Help : एखादा पदार्थ, जेवण किंवा गरजेच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचे काम डिलिव्हरी बॉय अगदी मिनिटांत करतात. यादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकणे, ग्राहकाचा पत्ता शोधून त्याच्याकडे पार्सल पोहचवणे आणि पुन्हा दुसऱ्या ऑर्डरकडे वळणे. यासगळ्यामुळे त्यांचे वेळापत्रक अधिकच व्यस्त होऊन जाते. पण, यादरम्यान सुद्धा ते कामाव्यतिरिक्त इतरांना अतिरिक्त मदत करताना दिसतात. पण, आज तर एका डिलिव्हरी बॉयमुळे अज्ञात माणसाला नोकरीवर मुलाखतीसाठी जाण्यास मदत मिळाली आहे.
linkedin अकाउंटवरील आकाश भोळे युजरने डिलिव्हरी बॉयमुळे कशाप्रकारे नोकरी मिळाली याबद्दल सांगितले आहे. तर घडलं असं की, @Aakash Bhole या युजरला नोकरीवर मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेले असते. पण, मुलाखतीला फोन येतो तेव्हा त्याला त्या दिवशी कॅब, ओला, उबर, अगदी टॅक्सी देखील मिळत नव्हती. उशिरा निघाल्यामुळे ट्रेनने जाणे सुद्धा शक्य नसते. यादरम्यान फ्लॅटमध्ये त्याच्या बरोबर राहणाऱ्या मित्राने जेवण ऑर्डर केले होते. मग आकाशने स्विगी बॉयला “मला सोडशील का असे विचारले”.
डिलिव्हरी बॉय बनला हिरो! (Viral Post)
आकाशने नाही ऐकण्याची तयारी केली होती. पण, “हो, हो, भाऊ, चला जाऊया, हे तर माझं काम आहे” असं तो अगदी सहज म्हणून त्याने आकाशला ऑफिसमध्ये सोडले आणि शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आकाशने मुलाखत दिली आणि त्याला नोकरी सुद्धा मिळाली. आकाश इतक्या घाईत होतो की, डिलिव्हरी बॉयचा नंबर घेऊ शकला नाही. पण, त्याने पोस्टमध्ये कृतज्ञता व्यक्त करत “अनुज जी, तुम्ही कुठेही असलात तरी, तुमच्या दयाळूपणाने माझे आयुष्य बदलले. स्विगी, हा माणूस बढतीस पात्र आहे” ; अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर ही पोस्ट linkedin अकाउंटवरून @Aakash Bhole या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. लिंक्डइनवरील ही व्हायरल पोस्ट झाल्यानंतर , युजर्स कमेंट सेक्शनमध्ये त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. “याला म्हणतात दयाळूपणा आणि माणुसकी”, “आकाश, तुला नोकरी मिळाली यासाठी शुभेच्छा. मलाही एकदा स्विगीच्या डिलिव्हरी बॉयकडून अशीच मदत मिळाली होती”, “कधी कधी खरे हिरो स्विगीची जॅकेट घालून दिसतात. अनुजजींनी जे केलं ते विसरण्यासारखं नाही”, “काय अप्रतिम गोष्ट आहे! कधी कधी अनपेक्षित मदतच आपल्या आयुष्याला दिशा देते” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी पोस्टखाली करताना दिसून आले आहेत.