Woman Working On Laptop Inside Theatre : ऑफिसचं काम वेळेत पूर्ण झालं की, मन अगदी प्रसन्न राहते. पण, संपूर्ण दिवभरात कुठेही जरासा वेळ दुर्लक्ष झाले की, वेळेत काम पूर्ण करून निघायचे कसे याची गडबड सुरूच असते. कधी वेळेत ट्रेन पकडून घरी पोहचण्याचे टेन्शन, तर कधी मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचं म्हणून काम संपवून निघण्याचे टेन्शन प्रत्येकाच्या मनात असते. मग अशावेळी आपण लॅपटॉप घेऊन ट्रेनमध्ये बसल्यावर किंवा आपण कुठेही जाऊ तिथे जाऊन काम पूर्ण करण्यात समाधान मानतो.

तर आज अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एक रेडिट युजरने ‘लोका’ (Lokah) चित्रपट बघण्यासाठी गेली होती. यादरम्यान चित्रपट चालू असताना पुढच्या रांगेत बसलेल्या एका महिलेने तिचा लॅपटॉप उघडला आणि ऑफिसचे काम करण्यास सुरुवात केली. एकीकडे चित्रपट चालू होता तर दुसरीकडे सीटच्या इथे बॅग ठेवून महिला लॅपटॉपवर टाइप करताना दिसत होती; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.

आजकाल तुम्हाला हे कुठेच नाही दिसणार (Viral Post)

सोशल मीडियावर ही पोस्ट रेडिट @Sea_Solution5627 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच “लोक दोन तास ऑफिसच्या कामापासून स्वतःला लांब ठेवू शकत नाहीत. कामाचा ताण त्यांच्या मागेच पडलेला असतो. काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं म्हणजे “वर्क-लाईफ बॅलन्स” . पण, आजकाल तुम्हाला हे कुठेच नाही दिसणार” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि बंगळुरूच्या कॉर्पोरेट क्षेत्राबद्दल चर्चा सुरू झाली. नेटकरी सुद्धा ही पोस्ट पाहून “तीला एखादी अर्जंट मिटिंग अटेंड करावी लागली असेल”, “कदाचित न कळवता काम सोडून ती चित्रपटाला आली असावी”, “हे गुलामगिरीसारखं आहे. मी एका माणसाला पाहिलं, तो सलूनमध्ये केस कापून घेत असतानाही काम करत होता” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.