Giant Python Fell From Ceiling : प्रत्येकाला आपले घर हे सुरक्षित ठिकाण वाटते. कोणतेही संकट आले किंवा भीती वाटली तरी व्यक्ती आधी आपल्या घराकडे धाव घेतो. त्यामुळे बहुतेकांना घराशिवाय जगात दुसरे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे असे वाटत नाही. परंतु प्रत्येकवेळी घर सुरक्षित असेलचं असे नाही. कारण घरातही अनेकदा अशाकाही घटना घडतात ज्या आपल्या जीवावर बेतणाऱ्या असतात. नुकताच सोशल मीडियावर एका घरातील एक व्हिडीओ समोर आले आहे जो पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यक्तीच्या घराच्या छताखालून असा एक महाकाय प्राणी बाहेर पडला जो पाहून तुमच्या अंगावर काटे येतील, त्यामुळे कमकुवत हृदय असणाऱ्यांनी हा व्हिडीओ नाही पाहिला तरी चालेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या छताच्या आत एक महाकाय अजगर अगदी आरामात राहत होता. ज्याला रेस्क्यू टीमच्या दोन जणांनी खेचूनही तो बाहेर येत नव्हता.

इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रेस्क्यू टीमचे दोन जवान छताचे सिलिंग तोडून लपलेल्या अजगराला काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काही केल्या तो अजगर खेचूनही बाहेर येत नाही. या अजगराच्या शेपटीवरून तो किती महाकाय असेल याचा अंदाज येतोय.

घराच्या छताखाली हा भलामोठा अजगर काही दिवसांपासून आरामात राहत होता, मात्र कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी तेथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यानंतर वन विभागाचे जवान तिथे आले आणि त्यातील एका जवानाने साप पकडण्याच्या काठीने अजगराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यात तुम्हाला महाकाय अजगराची एक भलीमोठी शेपटी दिसतेय. त्या शेपटीला पकडून जवान त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून तो खाली पडेल. मात्र काही केल्या तो अजगर छताखाली येत नाही. यानंतर आणखी एक व्यक्ती त्याला खाली ओढण्यासाठी मदत करतो.

सोशल मीडियाच्या @bilal.ahmad4d नावाच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओवर युजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटस येत आहेत. एका युजरने लिहिले की, आता मला माझ्या घरातील छताचीही भीती वाटू लागली आहे. तर दुसऱ्या एका युजरने, आता मला रात्री घरात झोपण्यासही भीती वाटतेय, अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending video giant python fell from celling shocking video viral in social media sjr