Viral video: अशी ही बनवाबनवी या अजरामर चित्रपटाचं नाव मराठी कला विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे झाली आहे तरी ही हा चित्रपट आज देखील लोकप्रिय आहे. आज देखील या चित्रपटाचा आनंद प्रेक्षक मनापासून घेत असतात.या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली असून या चित्रपटातील ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्याची क्रेझ काही वेगळीच आहे. आजकालच्या पिढीतही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. अशाच काही तरुणींचा याच गाण्याचावरचा जबरसदस्त असा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहून प्रत्येका तोंडून एकच वाक्य निघतंय क्या बात है.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून दोन तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच तरुणी पैठणी साडी नेसून ‘हृदयी वसंत फुलताना’ या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करत आहेत.  त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही कौतुक करेल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. हा व्हिडीओ पाहून एक क्षण असतं वाटतं की कुठल्या तरी चित्रपटातील सीन आहे. पण हा व्हिडीओ खऱ्या खुऱ्या आयुष्यातील आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल

डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. लहान मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्सच्या स्टेप्स करतात आणि मग पाहुण्यांपुढे त्या सादर करुन दाखवतात. सुट्टीच्या दिवसांत तर लाहन मुलींसाठी हा एक उद्योगच असतो. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. मग कधी घराच्या आजुबाजूच्या मुली किंवा अगदी बहिणी बहिणी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट सादर करुन जातात. नुकताच सोशल मीडियावर असाच एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ५ मुली अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral srk