Hero to Zero Biker River Video: पुलावरून पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत होता… कुणीच पूल ओलांडून पुढे जात नव्हतं. पण, एक जण मात्र ‘हीरोगिरी’ करण्याच्या थाटात पुढे सरसावतो. बाईक स्टार्ट होते… आणि सुरू होतो जीवघेणा खेळ! पायाखालची जमीन ओलसर नव्हे, थेट वाहणारी होती… काही क्षणांत सगळं बदलतं आणि तोच ‘हीरो’ ठरतो इंटरनेटवर ‘झिरो’! व्हिडीओमध्ये कैद झालेला हा प्रसंग पाहून तुम्हीही थरारून जाल…नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ सविस्तर…
राजस्थानातील टोंक जिल्ह्यातील बिसलपूर धरण परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि पुलावरून वेगाने पाणी वाहू लागले. अशा परिस्थितीत एक व्यक्ती स्वतःला ‘हीरो’ समजून बाईकसह या धोकादायक प्रवाहात उतरताना दिसते. मात्र पुढे जे घडतं, ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल!
धाडस की मूर्खपणा?
व्हिडीओमध्ये दिसतं की, एक शेतकऱ्याप्रमाणे दिसणारी व्यक्ती पुलावर उभा आहे. पाण्याच्या प्रवाहाला अतिशय वेग आहे; पण तो स्वतःचं धाडस दाखवीत बाईक चालवीत पूल ओलांडायचं ठरवतो. पण, बाईक पाण्यात पोहोचताच काही क्षणांतच त्याचा तोल जाऊन तो घसरतो आणि थेट पाण्यातून वाहून जाते. त्या व्यक्तीला बघणारे ओरडतात, “अरे पकड, अरे मनाई केलं होतं ना…” पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
बाईक गेली; पण जीव वाचला!
सुदैवाने त्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी बाईक सोडून दिली आणि स्वतःचा जीव वाचवला. व्हिडीओमध्ये दिसतं की, बाईक जोरदार प्रवाहात ओढली जाते आणि काही सेकंदांतच पूर्णतः नजरेआड होते. या घटनेचा व्हिडीओ @raja.meer.1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि अवघ्या तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.
‘हीरो’ बनण्याच्या नादात ‘झिरो’
व्हिडीओ पाहणाऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं – “हीरो बनायला गेला आणि झिरो बनून परतला.” अनेकांनी त्याच्या मूर्खपणावर टीका केली आहे. काहींनी याला “जागरूकतेचा अभाव आणि अति आत्मविश्वासाचा परिणाम”, असे म्हटले आहे.
सोपं वाटतं; पण धोकादायक असतं
स्थानिक लोकांना पुराच्या पाण्यात अडकून राहणं त्रासदायक वाटतं आणि मग ते पुढे जाण्यासाठी धाडसी निर्णय घेतात. मात्र असे पाण्यात बुडालेले पूल अत्यंत धोकादायक असतात. वाहने – विशेषतः बाईक – अशा वेगवान पाण्यात सहजपणे वाहून जातात, जसं की या व्हिडीओमध्ये दिसतं.
येथे पाहा व्हिडीओ
शेवटी शिकवण काय?
कधीही पाण्याने भरलेल्या पुलावरून वाहन चालवत जाण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःचा जीव, दुसऱ्यांची काळजी आणि वाहन – सगळे काही एका चुकीच्या निर्णयात गमावले जाऊ शकते. तुमचे धाडस तुमच्यावरच उलटू नये म्हणून सावध राहा.