Premium

अरे बापरे! आपल्याच वडिलांना ओळखणे झाले मुश्कील…; जुळ्या मुलींच्या निरागस प्रतिक्रियेचा व्हिडीओ पाहा

सध्या सोशल मीडियावर जुळ्या मुलींच्या निरागस रिॲक्शनचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कारण त्या आपल्या वडिलांनाच ओळखू शकत नाहीयेत. पण, असे नक्की का झाले आहे ते पाहा.

twins didn't recognize their father funny video
वडिलांना पाहून गोंधळात पडलेल्या या गोड जुळ्या मुलींचा व्हिडिओ पाहा. [photo credit – एक्स [पूर्वीचे ट्विटर] ]

सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही प्राण्यांचे, पक्षांचे, मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांचे वेगवेगळ्या पद्धतींचे व्हिडीओ सतत शेअर केले जात असतात. त्यापैकी काही आपल्याला रडवतात, तर काही पोट धरून हसायला भाग पाडत असतात. असाच आपल्याला पोट धरून हसायला लावणारा जुळ्या मुलींचा एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल होताना पाहायला मिळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

@pranavmahajan प्रणव महाजन या भारतीय पोलिस सेवा अधिकाऱ्याने, जोनाथन नॉर्मोइल नावाच्या व्यक्तीचा हा व्हिडीओ आपल्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा ३७ सेकंदांचा व्हिडीओ सर्वप्रथम २०२१ साली जोनाथन नॉर्मोइलने आपल्या टिकटॉक अकाउंटवरून शेअर केलेला होता. या व्हिडीओमध्ये दोन जुळ्या मुली एका सोफ्यावर बाजूबाजूला बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्या दोघींच्या समोर त्यांचे वडील उभे आहेत. मात्र, जोनाथनने आपले संपूर्ण केस कापले असून, दाढी मिशीसुद्धा ठेवली नव्हती. त्यामुळे जुळ्या मुली वडिलांकडे एका अनोळखी व्यक्तीप्रमाणे बघत बसल्या आहेत.

हेही वाचा : बापरे! ही बाई दररोज खाते अंगाला लावायची पावडर! नेमके प्रकरण काय ते जाणून घ्या…

“हाय, काय करताय?” असा प्रश्न जोनाथनने त्याच्या मुलींना केला. बराच वेळ काहीही न बोलता त्या नुसत्या त्याच्याकडे टक लावून निरीक्षण करत बसल्या होत्या. त्यानंतर जोनाथनने आपले दोन्ही हात आपल्या एका मुलीसमोर नेले असता त्या मुलीने रडण्यास सुरवात केली. आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी दुसऱ्या मुलीने आपला एक हात बहिणीसमोर रोखून धरला खरा, पण पाठोपाठ ती देखील रडू लागली.

लिडिया आणि हॅडली [Lydia and Hadley] अशी या गोंडस मुलींची नावे आहेत. “त्या दोघीही सतत खेळत आणि हसत असतात. जेव्हा त्यांच्यातली एक रडत असेल किंवा तिला वाईट वाटले असेल तर दुसरी लगेच तिच्या मदतीला आलेली असते, हे आम्ही पहिले आहे”, अशी माहिती ॲलिसनने टुडे पेरेंट्सला दिली.

पंकज महाजन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला, ‘वडिलांनी केस आणि दाढी केल्यानंतर अगदी अनोळखी व्यक्तीप्रमाणे दिसत आहेत. अशात स्वतः घाबरलेली असली तरीही बहिणीचे रक्षण करण्यासाठी ती तयार आहे, तुम्हाला फारच आवडेल”, असे कॅप्शन दिलेले आहे. या व्हिडीओला ४५ हजार व्ह्यूज मिळाले असून, भरपूर कमेंट्ससुद्धा आलेल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत पाहा

“म्हणून मला ट्विटर आवडते, अशा व्हिडीओसाठी. त्या एका मुलीने आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी हात पुढे केलाय, छान.” असे एकाने लिहिले. दुसऱ्याने, “awww… जुळ्यांमधली अशी खास मैत्री आणि नातं बऱ्याचदा पहिले आहे”, असे लिहिले आहे. तर शेवटी तिसऱ्याने, “किती छान रक्षण केलंय आपल्या बहिणीचे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Twin sisters did not recognize their father after he clean shaved his head and face watch priceless reaction on their faces dha

First published on: 10-12-2023 at 18:39 IST
Next Story
पाळण्यातील बाळाच्या तोंडावर म्हशीने टाकले शेण; श्वास गुदमरल्याने ६ महिन्याच्या चिमुकल्याचा झाला मृत्यू