Leaving aside the tension in life, uncle performed a tremendous Naagin dance; Viral Video | Loksatta

आयुष्यातील टेन्शन बाजूला सारून काकांनी केला जबरदस्त नागीण डान्स; Viral Video घातला इंटरनेटवर धुमाकूळ

जीवन जगण्यासाठी थोडीफार मजामस्ती करणेही तितकेच आवश्यक आहे, हेच आपण विसरत चाललो आहोत. तणावपूर्ण जीवनात असे क्षण आपल्याला नवी ऊर्जा देतात.

आयुष्यातील टेन्शन बाजूला सारून काकांनी केला जबरदस्त नागीण डान्स; Viral Video घातला इंटरनेटवर धुमाकूळ
मध्यमवयीन मित्रांचा एका पार्टीमध्ये मनसोक्त डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (ट्विटर)

जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे जबाबदारीचे ओझेही वाढू लागते. यामुळे अनेकदा लोक तणावपूर्ण जीवन जगू लागतात. आनंदाच्या क्षणीही ते आपला आनंद व्यक्त करू शकत नाहीत. किंबहुना जीवन जगण्यासाठी थोडीफार मजामस्ती करणेही तितकेच आवश्यक आहे, हेच आपण विसरत चाललो आहोत. तणावपूर्ण जीवनात असे क्षण आपल्याला नवी ऊर्जा देतात. एका मध्यमवयीन मित्रांच्या ग्रुपला ही गोष्ट चांगलीच पटली आहे. त्यांचा एका पार्टीमध्ये मनसोक्त डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यामध्ये आपण एक मध्यमवयीन पुरुषांचा ग्रुप मनसोक्त नागीण डान्स करताना पाहू शकतो. काही क्षणांसाठी आपल्या आयुष्यातील तणाव बाजूला सारून ते मस्त एन्जॉय करताना दिसत आहेत. या सर्व पुरुषांचे वय ४० पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातंय. उमदा पंक्तियां या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “जीवन जो शेष है, वही विशेष है.!” म्हणजेच “जे आयुष्य बाकी आहे ते खास आहे.”

…अन् सुप्रिया सुळेंना कुंकू लावताना विधवा सुनेला सासऱ्यांनी दिला आधार

या व्हिडीओमध्ये आपण काही पुरुषांना नागीण डान्स करताना पाहू शकतो. आपल्या मित्रांच्या सहवासात ते आपल्या बालपणीच्या आणि तारुण्याच्या दिवसांना उजाळा देत आहेत. दरम्यान, व्हिडीओमध्ये उपस्थित सर्वजण अतिशय खुश दिसत आहेत. प्रौढ अवस्थेत प्रवेश केल्यानंतर बहुतेक लोक आपले जीवन आपल्या मुलांसाठी आणि परिवारासाठी समर्पित करतात. यामध्ये ते स्वतःचे आयुष्यही विसरून जातात. मात्र, या व्हिडीओमधील लोक आयुष्यातील तणाव विसरून काही क्षणांसाठी आनंद साजरा करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत साडे सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २२ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO: पाण्यातील मगरीपासून सुटका…बाहेर येताच समोर भयानक बिबट्या; बिचाऱ्या हरणासोबत काय झालं ते एकदा पहाच

संबंधित बातम्या

जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!
हैद्राबादच्या निजामाची महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले
विश्लेषण : राज्य सरकारची ई – ऑफिस प्रणाली काय आहे? त्यामुळे लोकांची कामे वेळेत होणार का?
जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?