Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका धक्कादायक घटनेत, एक व्यक्ती पाठीमागून आला मिठी मारली आणि महिलेसोबत घाणेरडं कृत्य केलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरुन जात असलेल्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून संतापजनक प्रकार समोर आला. भररस्त्यात एका तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बुरखा घातलेली महिला रस्त्याने एकटी चालत असताना अचानक पाठीमागून आलेला एक तरुण तिला मिठी मारतो आणि चुकीच्या पद्धतीने तिच्या छातीलाही स्पर्श करतो. काही सेकंद हा तरुण या महिलेसोबत हे घाणेरडे कृत्य करतो. त्यानंतर महिला मागे वळून पाहूपर्यंत तो पळून जातो. नंतर प्रत्युत्तर म्हणून, महिलेने त्या पुरूषाला शिवीगाळ केली. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.