Viral video: देशात पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. वाढत्या महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यात लोकांचा खिसा मोकळा होत आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीने देसी जुगाड केला आहे, या जुगाडाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस म्हशीवर बसून रस्त्यावर आला आहे. एवढेच नाहतीर त्या व्यक्तीने सशाच्या आकाराचे हेल्मेटही घातले आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बुल रायडर नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच युजरने व्हिडिओवर कॅप्शन लिहिले आहे. “जेव्हा पेट्रोल महाग झाले तेव्हा मी त्याला त्याची किंमत दाखवली.” हा व्हिडिओ २५ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर शेकडो लोकांनी शेअरही केले आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक या पोस्टवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. वाढत्या महागाईमुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे कठीण होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सासरी जाताना नवरीनं केलं रडण्याचं नाटक; VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘पेट्रोलपेक्षा जास्त किंमत आली असती.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘हे सर्व पाहण्यासाठी मी २३८ रुपयांचा रिचार्ज करतो.’