Viral video: सध्या सगळीकडे लग्नाचा माहोल सुरु आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. यातच सर्वात भावनिक क्षण असतो ते म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. आपल्या मायेच्या माणसांना मिठी मारुन ढसाढसा रडते. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओतील नवरीला पाहून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. निरोपाच्या वेळी नवविवाहित वधूचे रडणे स्वाभाविक आहे. या दिवशी ती आपले कुटुंब सोडून नवीन कुटुंबात जाते. हा क्षण प्रत्येक कुटुंबासाठी भावनिक असतो. या व्हिडीओमध्ये नवरीची पाठवणी पाहून तुम्हाला सुरुवातीला धक्काच बसेल. मात्र नंतर तुम्हाला हसू आवरता येणार नाही. नवरीची पाठवणी हा खूप भावनिक क्षण असला तरी या नवरीच्या हाय व्होलटेज ड्रामामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगी निरोप घेतल्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जाताना दिसत आहे. कुटुंबाला सोडताना रडत असताना मुलीची अवस्था वाईट झाली होती. पण पुढच्याच क्षणी ती जोरजरात हसताना दिसत आहे. ती रडण्याचं नाटक करत होती. हे पाहून सगळेच हसू लागतात. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> एकावं ते नवलंच! जोडप्यानं ट्रेनमध्ये केलं लग्न; गर्दी बघून घाबरली तरुणी अन्…VIDEO चा शेवट नक्की पाहा सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @rawat2073 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत