Crow Man Viral Video: आजवर आपण सोशल मीडियावर अनेकांचे टॅलेंट पाहिले आहे. काहींची कलाकारी एवढी कमाल असते की आपल्याला अक्षरशः थक्क व्हायला होतं. काही मंडळी आपल्या कलेने आपल्याला आपण हे ‘काय’ पाहिलं असा प्रश्न पाडतात तर काहींची कलाकारी इतकी वेगळी असते की आपण हे ‘का’ पाहिलं असा प्रश्न करायला भाग पाडतात. आता सोशल मीडियावर अशाच एका भन्नाट टॅलेंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या दादांचं टॅलेंट काय तर कावळ्यांना बोलावणं. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण हा माणूस कावळ्यांना ज्या पद्धतीने हाक मारतो आणि विशेष म्हणजे त्यानंतर ज्या चपळाईने कावळे तिथे येतात ते बघून थक्क व्हायला होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@Comedyslam या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस मोकळ्या आकाशाखाली उभा आहे. मग काही आजूबाजूची लोकं त्याला वाह्ह भाई आप करके दिखाओ म्हणत असतात सुरुवातीला आपल्याला व्हिडीओ बघताना हा नेमका काय प्रकट आहे हे कळतच नाही. मग अचानक कावळ्यांचा जोरजोरात आवाज येऊ लागतो. तुम्ही आकाशात बघायला जाल तेवढ्यात कॅमेरा त्या पहिल्या माणसावर पॅन होतो आणि तिथे माणूस कावळ्याचा आवाज काढताना दिसतो. काहीच सेकंदात तिथे कावळ्यांची अक्षरशः शाळा भरते.

कावळा मॅनचा Video झाला व्हायरल

हे ही वाचा<< “सॉरी मुलींनो, माझी…” रिक्षावर लावलेलं पोस्टर होतंय Viral; नेटकरी विचारतात, आता मुली कशा जगतील?

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटकरी सुद्धा या माणसाच्या टॅलेंटला मजेशीर दाद देत आहेत. काहींनी म्हंटले की, “असा कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला कधीच कमी समजू नका, सोशल मीडियावर तर हे प्रकार करून तुम्ही स्टार बनू शकता.” दिवसभर ताण तणावाच्या घटना समोर येत असताना हा व्हिडीओ नकळत का होईना पण नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video man weird voice shocks netizens mimics crow so perfect that 100 animal gather in just five seconds watch here svs