Auto Rickshaw Viral Photo:ऑटो रिक्षा आणि ट्रक चालक वाहनांच्या मागील बाजूला काही वेळा इतके अनपेक्षित व विनोदी मेसेज लिहितात की मागच्या गाडीत बसलेल्यांना सुद्धा लोटपोट व्हायला होतं. अलीकडेच दिल्ली मधील एका रिक्षाचालकाने अशाच एका भन्नाट वाक्याने सगळ्यांना हसवून वेड लावलं आहे. आजवर अनेकदा तरुणींनी रिक्षाचालकांच्या गैर वर्तणुकीचे अनुभव शेअर केले आहेत. त्या सर्व रिक्षा चालकांनी सध्या व्हायरल होणाऱ्या या महोदयांचा आदर्श थोड्या फार प्रमाणात घ्यायला हवा. रिक्षाचालकाने महिलांसाठी व सुंदर तरुणींसाठी एक खास संदेश लिहिला आहे.

वंशिका गर्ग या सोशल मीडिया युजरने अलीकडेच एका ऑटो-रिक्षाचा फोटो शेअर केला आहे ज्याच्या मागील बाजूस एक संदेश आहे: “माफ करा मुलींनो, माझी पत्नी खूप कठोर आहे.”नोटीसवर महिलांना प्रवेश नाही असा स्टिकर सुद्धा लावला आहे. या व्हायरल फोटोवर आता काहींनी कमेंट करून मुलींना प्रवेश द्यायचा नाही असं करण्यापेक्षा तुम्ही मुलींना चुकीच्या नजरेने पाहूच नाही असं तुमच्या बायकोचं म्हणणं असेल अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

सॉरी मुलींनो..

 हे ही वाचा<< मॉडेलने कपड्यांना आग लावून केला कॅट वॉक; प्रेक्षकांनी मग जे केलं… Video पाहून अंगावर येईल काटा

दरम्यान काही युजर्सनी उपहासात्मक होत, “याला बोलतात प्रामाणिक नवरा ” अशी कमेंट केली आहे तर तर दुसर्‍याने, “अरे… आता मुली कशा जगतील?” असा मजेशीर प्रश्न केला आहे. तुम्हाला या रिक्षावाल्या महोदयांची भूमिका कशी वाटते नक्की कळवा.